जरांगे मराठा मुलांच्या भल्यासाठी नाही, तर… काॅंग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याचा गंभीर आरोप

जालना| मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाबाबत पत्रकार परिषद घेतली आहे. या वेळी त्यांनी सरकारला मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली आहे. मात्र त्यांनी केलेल्या या मागणीवर काँग्रेस नेते व राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गंभीर आरोप केले आहेत.

काय म्हणाले विजय वडेट्टीवार?

माध्यमांशी बोलत असताना वडेट्टीवार म्हणाले की, “जरांगे मराठा मुलांच्या भल्यासाठी नाही, तर राजकीय फायद्यासाठी सरसकट कुणबी प्रमाणपत्राची मागणी करत आहेत, मराठा समाजाला 10 टक्के ईडब्ल्यूएस आरक्षणातून फायदा होत असेल, तर तो मोठा फायदा आहे.”

एवढंच नाही तर, मनोज जरांगे पाटील यांची ईडब्ल्यूएस आरक्षणापेक्षा राजकीय आरक्षणाचा फायदा घेण्याची भूमिका असावी, म्हणून ते आग्रही आहेत. मनोज जरांगे मराठा मुलांच्या भल्यासाठी आग्रही नाहीत, तर राजकीय फायद्यासाठी आग्रही आहेत, असा माझा त्यांच्यावर थेट आरोप आहे, असं वडेट्टीवार म्हणाले.

वडेट्टीवार यांनी सरकारला एक आवाहन देखील केलं. ते म्हणाले “सरसकट कुणबी आरक्षणाच्या मागणीमुळे मराठा तरुणांचं खूप मोठं नुकसान होणार आहे. मराठा तरुणांनी याचा अभ्यास करावा. सरकारने जरांगे पाटलांच्या म्हणण्याप्रमाणे सगळे काही ठरवू नये.”

“सरकारने अभ्यास करून मराठा तरुणांच्या भविष्याचा निर्णय घ्यावा, असं माझं त्यांना आवाहन आहे. मुळात ओबीसींच्या 372 जातींमध्ये येऊन मराठा समाजाचा फार फायदा होणार नाही. ईडब्ल्यूएस आरक्षणात फार जाती नाहीत,” असं मत देखील विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं.

थोडक्यात बातम्या- 

शरद पवारांनी उपसलं हुमकी अस्त्र, अजित पवारांचं आता काय होणार?

भारत विरुद्ध नेदरलँड सामन्यासाठी मोठा बदल, ‘या’ मॅचविनर खेळाडूची संघात एन्ट्री!

‘हा’ माजी मंत्री अडचणीत; राजकारणात खळबळ

येत्या 24 तासांत ‘या’ जिल्ह्यांमध्ये कोसळणार पाऊस 

पाडव्याला गोविंद बागेत जाणार?; अजित पवारांनी स्वत:च सांगितलं