“उद्धव ठाकरेंना अडवताय, तुमची लायकी काय?”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | खासदार संजय राऊत कायम विरोधी पक्षांच्या नेत्यांवर टीका करत असतात. आता असताना संजय राऊत (Sanjay Raut) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी उद्धव ठाकरे यांना मुंब्र्यात पाऊल न ठेवू दिल्याने सरळ पोलिसांची लायकी काढली.

काय आहे नेमकं प्रकरण?

माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे ठाण्यात जाणार आहेत. मुंब्र्यातील शिवसेनेची शाखा बुलडोझर लावून तोडण्यात आली होती. त्यामुळे पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे येणार आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुंब्र्यात पाऊल न ठेवू देण्याचा चंग पोलिसांनी बांधला असल्याचा दावा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केला आहे.

घडलेल्या प्रकारामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. तर, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी थेट पोलिसांनाच ललकारलं आहे. तुम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अडवताय? तुमची लायकी काय?, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

असंख्य शिवसैनिकांची इच्छा होती म्हणून उद्धव ठाकरे येत आहेत. आम्ही जावू. पण उद्धव ठाकरे यांना मुंब्र्यात येण्यापासून रोखण्याचं कारस्थान पोलिसांनी रोखलं आहे. कालपासून पोलिसांनी मुंब्रा आणि ठाण्यात दहशत निर्माण केली आहे.

शिवसेना पदाधिकाऱ्यांना नोटीसा बजावल्या आहेत. तडीपार करण्याच्या धमक्या दिल्या आहेत. पोलिसांसमोरच पहाटेपर्यंत बॅनर्स फाडण्यात आले. या सगळ्या प्रकरणावरुन संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे.

थोडक्यात बातम्या- 

पुन्हा जोरदार पाऊस कोसळणार; वाचा हवामान खात्याचा अंदाज

जरांगे मराठा मुलांच्या भल्यासाठी नाही, तर… काॅंग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याचा गंभीर आरोप 

शरद पवारांनी उपसलं हुमकी अस्त्र, अजित पवारांचं आता काय होणार?

भारत विरुद्ध नेदरलँड सामन्यासाठी मोठा बदल, ‘या’ मॅचविनर खेळाडूची संघात एन्ट्री!

‘हा’ माजी मंत्री अडचणीत; राजकारणात खळबळ