Tanaji Sawant | तानाजी सावंत यांच्या गाडीला भीषण अपघात, तब्येतील महत्त्वाची माहिती हाती

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Tanaji Sawant | महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याबाबत एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. तानाजी सावंत यांच्या ताफ्यातील गाडीला भीषण अपघात झाल्याची माहिती आहे. या अपघातात तानाजी सावंत यांच्या ताफ्यातील गाडीचं प्रचंड नुकसान झाल्याचं दिसत आहे. तानाजी सावंत यांच्या या अपघाताबद्दल आता महत्त्वाची माहिती हाती येत आहे.

तानाजी सावंत यांच्या गाडीला अपघात कुठे झाला?

तानाजी सावंत (tanaji sawant) हे अंबाबाई देवीचं दर्शन घेऊन श्रीक्षेत्र ज्योतिबाच्या दर्शनाला निघाले होते. यावेळी त्यांच्या ताफ्यातील मागच्या गाडीने जोरदार धडक दिल्याची माहिती आहे. हा अपघात गाड्यांचा एकमेकांना अंदाज न आल्यामुळे घडल्याची माहिती आहे. दरम्यान, या अपघातामुळे तानाजी सावंत यांचा ताफा अपघातस्थळी थांबला होता.

तानाजी सावंत यांची तब्येत कशी?

तानाजी सावंत यांच्या गाडीला अपघात झाल्याने त्यांच्या समर्थकांनी त्यांच्या तब्येतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे, मात्र नुकत्याच मिळालेल्या माहितीनूसार तानाजी सावंत यांना कुठलीही दुखापत झालेली नाही. या अपघातात तानाजी सावंत यांच्या स्वीय सहाय्यकाला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती आहे. रविराज जाधव असं त्यांच्या स्वीय्य सहाय्यकाचं नाव आहे.

तानाजी सावंत यांचा अपघात कसा झाला?-

अंबाबाईचे दर्शन घेऊन तानाजी सावंत (tanaji sawant) जोतिबाच्या दर्शनाला निघाले असताना वाटेत त्याच्या ताफ्यातील गाडीला हा अपघात झाला. तानाजी सावंत ज्या गाडीत बसले होते, त्यांच्या पाठीमागच्या गाडीने धडक दिल्याची माहिती सध्या मिळत आहे.

तानाजी सावंत यांच्या ताफ्यातील गाडीने दिलेली धडक चांगलीच भीषण असल्याचं दिसत आहे. धडक देणाऱ्या गाडीचं बोनेट चांगलंच चेंबलेलं दिसत आहे. त्यामुळे तानाजी सावंत यांच्या या दौऱ्यात चांगलंच विघ्न आलेलं पहायला मिळालं.

दरम्यान, या अपघात मंत्री तानाजी सावंत (tanaji sawant) यांना दुखापत झाली नसून ते व्यवस्थित असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील एका महत्त्वाच्या मंत्र्याच्या गाडीला अपघात झाल्याने मोठी खळबळ उडाली होती.

News Title: Maharashtra minister tanaji sawant car accident

महत्त्वाच्या बातम्या-

Dhananjay Munde | मंत्री धनंजय मुंडेंना कोरोनाची लागण

Tanaji Sawant | मंत्री तानाजी सावंत यांच्या गाडीला भीषण अपघात, तब्येतील महत्त्वाची माहिती हाती

“Aishwarya Rai नाही, मी अभिषेकची पहिली पत्नी”; अभिनेत्री जान्हवी कपूरच्या दाव्याने उडाली होती खळबळ

Hardik Pandyaला आणखी एक लॉटरी लागणार?, Rohit Sharmaच्या नावाचाही होऊ शकतो विचार

मोठी बातमी! Sunil Kedar यांना दुसरा झटका