Hardik Pandyaला आणखी एक लॉटरी लागणार?, Rohit Sharmaच्या नावाचाही होऊ शकतो विचार

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | गुजरात टायटन्स कडून मुंबईच्या (Mumbai Indians) ताफ्यात सहभागी झालेल्या हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) आणखी एक लॉटरी लागण्याची शक्यता आहे. जानेवारीपासून सुरु होणाऱ्या अफगानिस्तान (INDvsAFG) विरोधातील टी-२० मालिकेसाठी हार्दिक पांड्या भारतीय संघाचा (Team India) कर्णधार होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. दुखापतीमुळे सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) संघाच्या बाहेर गेला आहे, त्यामुळे नवा कर्णधार शोधण्याची जबाबदारी बीसीसीआयवर येऊन पडली आहे.

हार्दिक पंड्या दुखापतीतून बाहेर?-

आयसीसीच्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत हार्दिक पांड्याच्या टाचेला दुखापत झाली होती, गेल्या काही दिवसांपासून तो भारतीय संघातून बाहेर आहे. त्याच्या अनुपस्थितीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (INDvsSA) झालेल्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची धुरा सूर्यकुमार यादवने सांभाळली होती, मात्र सूर्यकुमार यादव सुद्धा आता दुखापतीमुळे संघाच्या बाहेर गेला आहे.

जानेवारीमध्ये भारताची अफगानिस्तानविरोधात टी-२० मालिका पार पडणार आहे. आयपीएलपूर्वी (IPL 2024) होणारी ही मालिका भारतीय खेळाडूंसाठी महत्त्वाची मानली जात आहे. अशात सूर्यकुमार संघाबाहेर झाल्याने नवा कर्णधार कोण?, असा पेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळासमोर (BCCI) उभा ठाकला आहे.

हार्दिकशिवाय या नावांचाही विचार-

हार्दिक पांड्या दुखापतीतून बरा झाला तर तोच अफगानिस्तानविरोधात भारताचं नेतृत्त्व करेन, मात्र तसं झालं नाही तर भारतीय संघाच्या कर्णधारपदासाठी रोहित शर्माच्या नावाचा विचार सुरु असल्याची माहिती आहे. रोहित शर्माने गेल्या काही महिन्यांमध्ये टी-२० सामने खेळलेले नाहीत, मात्र त्याचा परफॉर्मन्स पाहता त्याच्याकडे नेतृत्त्व जाऊ शकतं असं मानलं जात आहे.

रोहित शर्माशिवाय भारताचा फिरकीपटू रवींद्र जडेजाच्या (Ravindra Jadeja) नावाचा देखील बीसीसीआयकडून विचार केला जाऊ शकतो, अशी माहिती आहे. मात्र जडेजा कर्णधारपद सांभाळण्यासाठी कितपत तयार आहे, यावर साऱ्या गोष्टी अवलंबून असल्याचं सांगितलं जातंय. अशा परिस्थितीत एखाद्या नव्या नावाचा देखील विचार होऊ शकतो.

दरम्यान, हार्दिक पांड्या दुखापतीतून बरा झाल्याची ताजी माहिती आहे, अजून याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. अफगानिस्तानविरोधात जरी तो उपलब्ध झाला नाही तरी आयपीएलमध्ये मात्र तो निश्चित उपलब्ध होऊ शकतो, अशी खात्रीलायक माहिती आहे.

News Title: Hardik Pandya or Rohit Sharma Who will lead Team India

महत्त्वाच्या बातम्या-

मोठी बातमी! Sunil Kedar यांना दुसरा झटका

…तर तुम्हाला महिन्याला 9,250 रुपये पेन्शन मिळेल; Post Office ची जबरदस्त योजना

Hardik Pandya समोर चाहत्यांनी खरोखर “मुंबईचा राजा, रोहित शर्मा” घोषणा दिल्या का?, नवीनच माहिती आली समोर

Brij Bhushan Singh | ब्रिजभूषण सिंह यांना झटका; सरकारने घेतला सर्वात मोठा निर्णय

सावधान! गुंतवणूकदारांना Share Market तज्ज्ञांचा अत्यंत महत्त्वाचा सल्ला