…तर तुम्हाला महिन्याला 9,250 रुपये पेन्शन मिळेल; Post Office ची जबरदस्त योजना

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Post Office Scheme | तुम्हाला पोस्ट ऑफिसमधून (Post Office) मोठी कमाई करायची असेल, तर पोस्टाने तुमच्या कमाईसाठी चांगली संधी आणली आहे. आज आम्ही तुम्हाला पोस्टाच्या एका अतिशय फायदेशीर योजनेबद्दल सांगणार आहोत. पोस्ट ऑफिसच्या या योजनेचं नाव मासिक उत्पन्न योजना आहे.

Post Office ची जबरदस्त योजना 

या योजनेची सर्वात खास गोष्ट म्हणजे मासिक उत्पन्न योजनेत एकदा गुंतवणूक करून तुम्हाला दरमहा 9,250 रुपये पेन्शन मिळू शकते. अशा परिस्थितीत ही योजना तुमच्यासाठी नियमित उत्पन्न म्हणून काम करेल.

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणूक केल्याने तुम्हाला अनेक मोठे फायदेही मिळतील. या पोस्ट ऑफिस योजनेत गुंतवणूक करून, तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या बाजारातील जोखमीचा सामना करावा लागणार नाही.

Post Office | सिंगल आणि जॉइंट दोन्ही खाते उघडू शकता

गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून हे खूपच सुरक्षित आहे. सध्या या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला 7.4 टक्के व्याज मिळत आहे. या पोस्ट ऑफिस स्कीममध्ये तुम्ही तुमचे खाते सिंगल आणि जॉइंट दोन्ही उघडू शकता. संयुक्त खात्यात तीन लोक एकत्र गुंतवणूक करू शकतात.

तुम्ही तुमच्या पत्नीसोबत संयुक्त खातं उघडल्यास तुम्ही या योजनेत जास्तीत जास्त 15 लाख रुपयांची गुंतवणूक करू शकता. जर तुम्ही या योजनेत 15 लाख रुपये जॉइंट अकाउंट अंतर्गत गुंतवले, तर 7.4% व्याज दराने मोजले तर तुम्हाला 1.11 लाख रुपये वार्षिक उत्पन्न मिळेल.

अशा परिस्थितीत, तुम्हाला या योजनेअंतर्गत दरमहा सुमारे 9,250 रुपये मिळतील. जर तुम्ही या योजनेत तुमचे एकल खातं उघडलं तर तुम्ही या योजनेत जास्तीत जास्त 9 लाख रुपयांची गुंतवणूक करू शकता. या प्रकरणात तुम्हाला दरमहा 5,500 रुपये मिळतील.

महत्त्वाच्या बातम्या- 

Brij Bhushan Singh | ब्रिजभूषण सिंह यांना झटका; सरकारने घेतला सर्वात मोठा निर्णय

सावधान! गुंतवणूकदारांना Share Market तज्ज्ञांचा अत्यंत महत्त्वाचा सल्ला

Pune-Ahmednagar | पुणे-नगर रस्त्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली मोठी घोषणा

Entertainment News | “माझा होशील ना”फेम अभिनेत्रीनं दिला मोठा धक्का, ‘या’ व्यक्तीसोबत लग्नबंधनात अडकणार!

Maruti Suzuki, TATA की Hyundai?, 2023 मध्ये भारतीयांनी Googleवर कोणत्या कंपनीच्या गाड्या सर्वात जास्त शोधल्या?