Hardik Pandya समोर चाहत्यांनी खरोखर “मुंबईचा राजा, रोहित शर्मा” घोषणा दिल्या का?, नवीनच माहिती आली समोर

Hardik Pandya | IPL 2024 साठी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाचा कर्णधार झालेल्या हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांचा रोष सहन करावा लागत आहे. गुजरात टायटन्सकडून मुंबई इंडियन्सने हार्दिकला विकत घेतलं आणि त्यानंतर तडकाफडकी रोहित शर्माला कर्णधारपदावरुन काढून थेट हार्दिक पांड्याला कर्णधार केलं. मुंबईच्या चाहत्यांना हा निर्णय काही पटला नाही आणि त्याचा फटका हार्दिक पांड्याला बसताना पहायला मिळत आहे, मात्र यासंदर्भातच एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत होता. या व्हिडीओबद्दल नवा खुलासा समोर आला आहे.

नेमका काय प्रकार घडला?

हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) मुंबई इंडियन्सचं कर्णधार केल्याने मुंबई इंडियन्सचे चाहते चांगलेच संतापले आहेत. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) म्हणजे रोहित शर्मा आणि रोहित शर्मा म्हणजे मुंबई इंडियन्स असं गेल्या काही वर्षांचं समीकरण असताना मुंबईच्या संघ व्यवस्थापनाने (Mumbai Indians Owner) अचानक हार्दिक पांड्याला गुजरातकडून (Gujrat Titans) विकत घेऊन थेट संघाच्या कर्णधारपदी बसवलं. यानंतर आता एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

हार्दिक पांड्या मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) उतरत असल्याचं या व्हिडीओत पहायला मिळत आहे, तसेच यावेळी अचानक मुंबईच्या चाहत्यांची घोषणाबाजी केल्याचं संबंधित व्हिडीओत ऐकायला मिळत आहे. मात्र या व्हिडीओबद्दल आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.

तो व्हिडीओ खरा नाही-

व्हिडीओत हार्दिक पांड्या मुंबई विमानतळावर गाडीतून उतरताना पहायला मिळत आहे. यावेळी एकाएकी “अरे मुंबईचा राजा, रोहित शर्मा”, “अरे मुंबईचा राजा, रोहित शर्मा”(Are Mumbaicha Raja, Rohit Sharma) अशा घोषणा बॅकग्राऊंडला वाजताना पहायला मिळत आहे. मात्र आता याबद्दल नवीन माहिती समोर आली आहे. हा व्हिडीओ खोटा (Hardik Pandya Fake Video) असल्याचं समोर आलं आहे.

संबंधित व्हिडीओ जुना असल्याचं Youtubeवर असलेल्या व्हिडीओवरुन लक्षात येतंय. खालील फोटोमध्ये मूळ व्हिडीओ यूट्यूबवर अपलोड केल्याचा तारीख सुद्धा तुम्ही पाहू शकता. हा व्हिडीओ 22 ऑक्टोबर 2020 साली अपलोड केल्याचं यावरुन स्पष्ट होतंय. अर्थातच आता व्हायरल होणारा व्हिडीओ कुणीतरी जाणूनबुजून एडिट करुन पोस्ट केल्याचं दिसून येत आहे.

Screenshot of actual date for Hardik Pandya video

रोहित शर्माच राहणार मुंबई इंडियन्सचा कर्णधार?-

हार्दिक पांड्या त्याच्या टाचेच्या दुखण्यामुळे सध्या भारतीय क्रिकेट संघाच्या (Team India) बाहेर आहे. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनूसार, त्याच्या दुखण्याबद्दल काहीच अपडेट आलेले नाहीत, त्यामुळे त्याच्या आयपीएल खेळण्याच्या शक्यतेवर प्रश्नचिन्ह आहे. दुखापतीमुळे हार्दिक आयपीएल खेळू शकला नाही तर त्याच्या जागी पुन्हा एकदा रोहित शर्माच्या खांद्यावरच कर्णधारपदाची धुरा सोपवली जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

News Title: Hardik Pandya Fake Video Circulated on Social Media

महत्त्वाच्या बातम्या-

सावधान! गुंतवणूकदारांना Share Market तज्ज्ञांचा अत्यंत महत्त्वाचा सल्ला

Pune-Ahmednagar | पुणे-नगर रस्त्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली मोठी घोषणा

Entertainment News | “माझा होशील ना”फेम अभिनेत्रीनं दिला मोठा धक्का, ‘या’ व्यक्तीसोबत लग्नबंधनात अडकणार!

Maruti Suzuki, TATA की Hyundai?, 2023 मध्ये भारतीयांनी Googleवर कोणत्या कंपनीच्या गाड्या सर्वात जास्त शोधल्या?

Elvish Yadav मित्राला मारहाण होत असताना पळून गेला?, वैष्णोदेवीच्या दर्शनावेळी नेमकं काय घडलं???