Brij Bhushan Singh | ब्रिजभूषण सिंह यांना झटका; सरकारने घेतला सर्वात मोठा निर्णय

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | नवीन कुस्तीपटू आणि ब्रिजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Singh) यांच्याबाबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने WFI ची नवीन संस्था निलंबित केली आहे. भारतीय कुस्ती संघटनेचे नवे अध्यक्ष संजय सिंग आणि त्यांच्या संपूर्ण टीमला निलंबित करण्यात आलं आहे. ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिकची निवृत्ती आणि बजरंग पुनियाचा (Bajrang Punia) पद्मश्री पुरस्कार परत केल्यानंतर क्रीडा मंत्रालयाने हा मोठा निर्णय घेतला आहे.

Brij Bhushan Singh | क्रीडा मंत्रालयाचा सर्वात मोठा निर्णय

यासोबतच क्रीडा मंत्रालयाने कुस्ती संघाचे आगामी सर्व कार्यक्रमही रद्द केले आहेत. क्रीडा मंत्रालयाने आपल्या आदेशात म्हटलं आहे की, नवीन असोसिएशनने नियमांविरुद्ध आगामी स्पर्धा आणि कार्यक्रम जाहीर केलं होतं.

Brij Bhushan Singh | कुस्ती महासंघचं बरखास्त केला

ज्यामध्ये नंदिनी नगर, गोंडा येथे अंडर-15 आणि अंडर-20 राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावर साक्षी मलिकसह अनेक महिला कुस्तीपटूंनी प्रश्न उपस्थित केले होते. यापुढे कुस्ती संघटना कोणताही निर्णय घेऊ शकणार नाही, असं क्रीडा मंत्रालयाने आदेशात म्हटलं आहे.

कुस्ती संघटनेच्या कार्यक्रमांच्या घोषणेनंतर साक्षी मलिकने ट्विट केलं होतं की, मी कुस्ती सोडली आहे, पण काल ​​रात्रीपासून काळजीत आहे. त्या ज्युनियर महिला कुस्तीपटूंनी काय करावं जे मला फोन करून सांगत आहेत की 28 तारखेपासून दीदी ज्युनियर होईल?.

यापूर्वी, क्रीडा मंत्रालयाने एक निवेदन जारी केलं होतं की WFI निवडणुका निष्पक्ष आणि लोकशाही पद्धतीने पार पडल्या. यासोबतच बजरंगने पद्मश्री पुरस्कार परत करण्यावर मंत्रालयाने म्हटलं होतं की, हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असून आम्ही यापुढेही बजरंगकडे पद्मश्री पुरस्कार परत करण्याचा निर्णय बदलण्याची मागणी करणार आहोत.

दरम्यान, साक्षी मलिकसह इतर महिला कुस्तीपटू यांनी बृजभूषण यांच्यावर महिला कुस्तीपटूंच्या लैगिंक छळाचा आरोप केला होता. त्यांनी दिल्लीत मोठे आंदोलन पण उभारले होते.

महत्त्वाच्या बातम्या- 

सावधान! गुंतवणूकदारांना Share Market तज्ज्ञांचा अत्यंत महत्त्वाचा सल्ला

Pune-Ahmednagar | पुणे-नगर रस्त्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली मोठी घोषणा

Entertainment News | “माझा होशील ना”फेम अभिनेत्रीनं दिला मोठा धक्का, ‘या’ व्यक्तीसोबत लग्नबंधनात अडकणार!

Maruti Suzuki, TATA की Hyundai?, 2023 मध्ये भारतीयांनी Googleवर कोणत्या कंपनीच्या गाड्या सर्वात जास्त शोधल्या?

Elvish Yadav मित्राला मारहाण होत असताना पळून गेला?, वैष्णोदेवीच्या दर्शनावेळी नेमकं काय घडलं???