Dhananjay Munde | मंत्री धनंजय मुंडेंना कोरोनाची लागण

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Dhananjay Munde | जगभरातील काही देशात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. भारतातही गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. महाराष्ट्रातही कोराना रूग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. अशात चिंतेची बाब म्हणजे राज्याचे राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी देखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आलीये.

Dhananjay Munde | धनंजय मुंडेंना कोरोनाची लागण

धनंजय मुंडे यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. ते सध्या पुण्यातील मॉडर्न कॉलनीमध्ये असलेल्या घरी कॉरनटाइन आहेत. घरीच त्यांच्यावर औषधोपचार सुरु आहेत.

नागपूर अधिवेशनानंतर त्यांनी कोरोनाची चाचणी केली होती. मुंडे हे सध्या पुण्यातील निवासस्थानी क्वारंटाइन आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार धनंजय मुंडे यांच्यावर उपचार सुरू आहेत. मंत्री धनंजय मुंडे हे गेल्या दोन दिवसांपासून पुण्यातील घरी आहे. मु्ंडे यांना गेल्या दोन दिवसांपासून खोकला आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी कोरोना चाचणी केली. त्यात मुंडे यांना कोरोनाची लागण झाली.

Dhananjay Munde | देशभरात कोरोना रूग्णांची वाढ

मागील 15 दिवसांमध्ये देशभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. भारतामध्ये सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या 3742 इतकी झाली आहे. जेएन.1 या नव्या व्हेरियंटचेही रुग्ण वाढत आहेत. मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात सक्रीय रुग्णांच संख्या दुपट्ट झाली आहे. जगभराप्रमाणेच भारतामध्येही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.

सध्या असलेला व्हेरियंट आधीसारखा धोकादायक नाही. आतापर्यंत, कोविडची लागण झालेल्यांमध्ये सौम्य लक्षणे आहेत. रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाणही वाढलेले नाही.

महत्त्वाच्या बातम्या- 

Tanaji Sawant | मंत्री तानाजी सावंत यांच्या गाडीला भीषण अपघात, तब्येतील महत्त्वाची माहिती हाती

“Aishwarya Rai नाही, मी अभिषेकची पहिली पत्नी”; अभिनेत्री जान्हवी कपूरच्या दाव्याने उडाली होती खळबळ

Hardik Pandyaला आणखी एक लॉटरी लागणार?, Rohit Sharmaच्या नावाचाही होऊ शकतो विचार

मोठी बातमी! Sunil Kedar यांना दुसरा झटका

…तर तुम्हाला महिन्याला 9,250 रुपये पेन्शन मिळेल; Post Office ची जबरदस्त योजना