Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या प्रकृतीबाबत चिंताजनक माहिती समोर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Manoj Jarange | मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. बीड येथील जरांगे पाटील यांची इशारा सभा पार पडली. यानंतर जरांगेंची प्रकृती खालावली असता त्यांना बीडमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 24 डिसेंबरपर्यंत जरांगेंनी मराठा आरक्षणासाठी कालावधी दिला होता. दरम्यान, सरकारने आद्यापही ठोस निर्णय घेतलेला नाहीये.

नेमकं काय घडलं?

मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील यांची आज बीड येथे इशारा सभा पार पडली. सभेनंतर जरांगे पाटील यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना बीड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जरांगेंवर सध्या बीड रुग्णालयात उपचार चालू आहे. शिवाय जरांगेंना डाॅक्टरांकडून सलाईन देखील लावण्यात आले आहेत.

गेले अनेक दिवस मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील राज्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन जाहीर सभा घेत आहेत. जरांगे पाटील यांच्या सभेला लाखो मराठा बांधव पाठिंबा देत आहेत.

बीड येथे इशारा सभा-

सकारला वारंवार इशारा देऊन सुद्धा यावर अजून सरकारने कोणतीच ठोस भूमीका घेतली नाहीये. त्यामुळे जरांगे पाटील यांनी आज बीड येथे इशारा सभा घेतली होती.

दरम्यान, जरांगे छत्रपती संभाजीनगरला पोहोचताच त्यांना भेटण्यासाठी रुग्णालयात मराठा समाजबांधवांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

देव जरी आडवा आला तरी?

दरम्यान, बीड येथे काल जरांगेंची सभा पार पडली होती. या वेळी बोलत असताना जरांगे म्हणाले “आता देव जरी आडवा आला, तरी मराठ्यांना OBCतूनच आरक्षण घेणार. जातीपेक्षा मोठा नेता मानू नका, आपली मते घेण्यापुरता दारी आला तर त्याला चपलेने बडवा.

News title : manoj jarange is hospitalized at beed

महत्त्वाच्या बातम्या-

Dhananjay Munde | मंत्री धनंजय मुंडेंना कोरोनाची लागण

Tanaji Sawant | तानाजी सावंत यांच्या गाडीला भीषण अपघात, तब्येतील महत्त्वाची माहिती हाती

“Aishwarya Rai नाही, मी अभिषेकची पहिली पत्नी”; अभिनेत्री जान्हवी कपूरच्या दाव्याने उडाली होती खळबळ

Hardik Pandyaला आणखी एक लॉटरी लागणार?, Rohit Sharmaच्या नावाचाही होऊ शकतो विचार

मोठी बातमी! Sunil Kedar यांना दुसरा झटका