Shahid Kapoor | अभिनेता शाहिद कपूरने घेतली सर्वात महागडी कार; किंमत वाचून थक्क व्हाल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) यानं नुकतीच नवीन कार खरेदी केली आहे. शाहिदने नवीन आलिशान कार घरी आणली आहे. अभिनेत्याने नवीन मर्सिडीज मेबॅक जीएलएस 600 खरेदी केलीये. त्याची किंमत 3.5 कोटी रुपये आहे.

Shahid Kapoor | शाहिद कपूरने घेतली महागडी कार

शाहिद लग्झरी गाड्यांचा शौकिन आहे. त्याच्याकडे महागड्या गाड्यांचं कलेक्शन आहे. या कलेक्शनमध्ये शाहिदनं आणखी एक मर्सिडीज Maybach कार खरेदी केली आहे. शाहिदनं खरेदी केलेल्या Mercedes-Maybach GLS 600 या कारची किंमत 4.75 कोटी रूपये आहे.

Shahid Kapoor | कारची किंमत वाचून थक्क व्हाल

शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि मीरा कपूर यांच्या घरी आलेली मर्सिडीज मेबॅक जीएलएस कार काळ्या रंगाची आहे, ज्याची किंमत 4.75 कोटी रुपये आहे. मेबॅकने अलीकडेच त्याच्या अधिकृत पेज मेबॅक इंडियावर एक फोटो शेअर केला आहे.

ज्यामध्ये शाहिद कपूर आणि मीरा राजपूत कारसोबत पोज देत आहेत. आता शाहिदचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहतेही या फोटोवर कमेंट करत आहेत आणि अभिनेत्याला नवीन कारसाठी शुभेच्छा देत आहेत.

शाहीद कपूरने मागील वर्षी देखील Maybach S580 नावाची लक्झरी कार खरेदी केली होती. या कारसहीत शाहिदकडे आधी MaybachS580, Range Rover Vogue, Porsche Cayenne GTS, Jaguar XKR-S आणि मर्सिडीज-AMG S400 कार आहेत. या सगळ्या कारची किंमत कोटींच्या घरात आहेत.

प्रोफेशनल फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर शाहिद कपूर यावर्षी ‘फर्जी’ आणि ‘ब्लडी डॅडी’ सारख्या प्रोजेक्टमध्ये दिसला होता. आता तो पुढील प्रोजेक्ट ‘देवा’ मध्ये दिसणार आहे, जो दसरा 2024 ला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

याशिवाय शाहिद जिओ स्टुडिओ आणि दिनेश विजान यांच्या अनटायटल चित्रपटातही दिसणार आहे. हा चित्रपट 9 फेब्रुवारी 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे ज्यामध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री क्रिती सेनन दिसणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

Job Alert | 12 वी पास असणाऱ्यांसाठी ISRO मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, असा करा अर्ज

Chhagan Bhujbal | महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी छगन भुजबळांना मोठा धक्का!

Radhakrishna Vikhe Patil | महाराष्ट्रात नव्या जिल्ह्यांची निर्मिती होणार?, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी स्पष्ट सांगितलं

Teacher Recruitment | शिक्षकांना मोठा धक्का!, शिक्षक भरतीबाबत आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी

Weather Update | “येत्या दोन दिवसात…”, राज्यातील थंडीबाबत हवामान खात्याचा सर्वात महत्त्वाचा अंदाज