नवी दिल्ली | पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले. त्याला पर्याय म्हणून वीजेवर चालणाऱ्या बाईक आणि कार बाजारात आल्या. इतकं सगळं असलं तरी आता ना पेट्रोल (Petrol),ना डिझेल आणि ना वीज यांपैकी कोणत्याही गोष्टीची गरज पडणार नाही आहे. आता कोणत्याही इंधनाशिवाय चालणारी कार बाजारात आली आहे
उत्कृष्ट इंजिनची (engine) कार बनवण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. जगभरात हे प्रयोग होत आहेत. यातच आता एका कंपनीनं Quantino Twentyfive कार बनवली आहे. ही कार चालवण्यासाठी पेट्रोल, डिझेल वीज किंवा हायड्रोजनची गरज भासणार नाही. हे ऐकताना थोडसं विचित्र वाटेल पण हे तितकंच खरं आहे.
ही नवीन कार आता कोणत्याही इंधनाशिवाय(Without fuel) चालणार आहे. यासाठी समुद्राचे खारं पाणी लागणार आहे. इतकंच नव्हे तर ही कार सांडपाण्यापासूनदेखील तुम्ही चालवू शकता. या कारमध्ये विशेष नॅनो संरचित रेणू बाय-आयन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आली आहे, समुद्राच्या खाऱ्या पाण्याव्यतिरिक्त औद्योगिक सांडपाण्यापासून (Industrial Wastewater) चालवण्यासाठी केला जाईल.
हे पाणी जैवइंधनासारखं (Biofuels) काम करेल. पाण्यात असणाऱ्या ज्वल्नशील, बिनविषारी घटकांपासून पाण्यातून वीज तयार होईल. ती वीज कारच्या चार चांकामध्ये बसवलेल्या मोटार मध्ये पाठवली जाईल आणि कार सुरु होईल. एकदा या पाण्याचा टॅकर फुल केल्यानंतर ही कार दोनहजार किलोमीटर अंतर आरामात पार करु शकते.
दरम्यान, या कारमुळं कोणत्याही प्रकारचं प्रदूषण होणार नाही आहे. भविष्यात फरारी, बेंटले (Bentley), लॅम्बोर्गिनी(Lamborghini),ऑडी (Audi), मर्सिडीज (Mercedes), बीएमडब्ल्यू (BMW) यांसारख्या कारशी देखील स्पर्धा करु शकते. या कारची रचना सुपरकार्ससारखी ठेवण्यात आली आहे. ही गाडी लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या