Pune News | पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची कोथरुड येथील परिसरात भरदिवसा तीन गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. जेवण करुन घराबाहेर निघाल्यावर शरदवर पाठीमागून गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. शरद मोहोळचा खून त्याच्याच जवळच्या व्यक्तीने केल्याचं तपासातून समोर आलं आहे. त्यानंतर रोज नवनवीन खुलासे बाहेर येत आहेत. शरद मोहोळ याची पत्नी स्वाती यांनी शरदच्या हत्येनंतर पहिली प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाल्या स्वाती मोहोळ?
शरद मोहोळच्या हत्येनंतर (Pune News) पत्नी स्वाती मोहोळ यांनी आज पहिल्यांदा यावर भाष्य केलं. स्वाती मोहोळ म्हणाल्या “माझा नवरा हा वाघ होता आणि मी वाघीण आहे. तसेच शेवटच्या श्वासापर्यंत आपण हिंदुत्ववादासाठी काम करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं.
पुढे काय म्हणाल्या?
शरद मोहोळच्या (Pune News) हत्येनंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी स्वाती मोहोळची भेट घेतली. दरम्यान, यावेळेस त्या म्हणाल्या की, “समोरच्याला जर असं वाटत असेल की अशा घटनेमुळे मी खचून जाणार तर त्यांना मला एकच सांगायचं आहे, मी हिंदुत्ववाद्याची बायको आहे. माझा नवरा हा वाघ होता आणि मी वाघीण आहे. शेवटचा श्वास असेपर्यंत मी हिंदुत्वासाठी काम करणार”.
शरदची पत्नी स्वाती मोहोळ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. स्वाती मोहोळ यांनी पक्षप्रवेश केला तेव्हा कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील, शहाराध्यक्ष जगदीश मुळीक आणि प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ उपस्थित होते. शरद मोहोळ याच्या पत्नीने भाजपमध्ये प्रवेश केल्यावर अनेकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती.
शरद मोहोळ राजकारणात करणार होता एन्ट्री
स्वाती मोहोळ यांच्या भाजप पक्ष प्रवेशानंतर शरद मोहोळ राजकारणात एन्ट्री करणार अशीही चर्चा होती. पण त्या आधीच त्याची हत्या करण्यात आली. तर शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ या भाजपच्या पुणे शहर महिला आघाडीच्या सरचिटणीस आहेत.
दरम्यान, शरद मोहोळच्या हत्येनंतर आता या प्रकरणाचं राजकारण होणार असल्याचं दिसतंय. शरद राहात असलेल्या कोथरुड मतदारसंघात या प्रकरणाचे पडसाद उमटू शकतात.
News Title : pune news sharad mohol wifes first reaction
महत्त्वाच्या बातम्या-
Sharad Mohol | शरद मोहोळच्या बायकोचा अत्यंत खळबळजनक आरोप!
Raj Thackeray | “थेट, परखड आणि 100 टक्के…”; ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने केलं राज ठाकरेंचं कौतुक
‘लक्षद्वीप-मालदीव’ प्रकरणी Amitabh Bachchan यांचं मोठं वक्तव्य!
Rashmika Mandanna ने दिली गुड न्यूज, ‘या’ अभिनेत्यासोबत थाटणार संसार