Raj Thackeray | “थेट, परखड आणि 100 टक्के…”; ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने केलं राज ठाकरेंचं कौतुक

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Raj Thackeray | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आपल्या रोखठोक वक्तव्यांमुळे प्रचलित आहेत. त्यांनी मराठी कलाकारांबाबत केलेल्या विधानामुळे अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) फारच प्रभावित झाली आहे. शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात राज ठाकरे यांनी केलेल्या विधानाला तेजस्विनी पाठींबा दिला आहे.

“तुम्ही जर एकमेकांना मान नाही दिला तर प्रेक्षक तुमचा मान कसा राखतील?, त्यामुळे सर्वांनी एकमेकांचा आदर ठेवायला हवा”, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. त्यांच्या या विधानावरच तेजस्विनीने (Tejaswini Pandit) आपल्या सोशल मिडीयावर स्टोरी ठेवत त्यांचे कौतुक केले आहे.

Tejaswini Pandit ची पोस्ट

“मी जेव्हा कधी इतर भाषिक कलाकारांना भेटतो तेव्हा ते एकमेकांना खूप आदराने हाक मारताना दिसून येतात. पण, मराठी कलाकारांबाबतीत हे दृश्य जरा वेगळे दिसून येते. मराठी कलाकार एकमेकांसोबत त्या अदबीने वागत नाही. तुम्ही जर एकमेकांचा मान ठेवला नाही तर प्रेक्षक तुमचा मान कसा राखतील? त्यामुळे एकमेकांना मान द्या अन् दुसऱ्यांचाही मान ठेवा”, असा सल्ला राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात दिला होता.

राज ठाकरे यांच्या या विधानाचे तेजस्विनी पंडितने (Tejaswini Pandit) आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर कौतुक केले आहे. राज ठाकरेंच्या मुलाखतीचा व्हिडीओ शेअर करत तिने ‘थेट, परखड आणि 100 टक्के बरोबर राजसाहेब!’, असे म्हटले आहे.

Raj Thackeray यांचा सल्ला

“पूर्वी मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीमध्ये कित्येक सुपरस्टार होते. मात्र आता केवळ कलाकार राहिले आहेत. मराठी कालाकार एकमेकांशी बोलताना टोपण किंवा शॉर्ट नावाने हाक मारतात. तुम्ही एकमेकांना मान दिला नाही तर प्रेक्षक तुम्हाला मान कसा देतील? एकमेकांना मान दिला तर मराठी रंगभूमीला चांगले दिवस येतील.”, असे राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी म्हटले. त्यांच्या या विधानावरच तेजस्विनीने (Tejaswini Pandit) आपली प्रतिक्रिया दिली.

यावेळी त्यांनी दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत आणि ज्येष्ठ संगीतकार इलायराजा यांचंही उदाहरण दिलं. राज ठाकरे यांनी ‘नाटक आणि मी’ या विषयावर मुलाखत घेण्यात आली. याच मुलाखतीत त्यांनी मराठी कलाकारांबाबत भाष्य केलं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

Malaika Arora | मलायका आणि अर्जुन कपूरचं ब्रेकअप?; अखेर खुलासा झाला

Golden Globe Awards 2024 l गोल्डन ग्लोब पुरस्कार पटकावणाऱ्या विजेत्यांची संपूर्ण यादी पाहा एका क्लिकवर!

Bilkis Bano प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा गुजरात सरकारला मोठा झटका!

Aprilia RS 457 l बाइकप्रेमींनो… Aprilia RS 457 स्पोर्ट्स बाईक धुमाकूळ घालण्यास सज्ज

Post Office Scheme 2024 l पोस्टाची ही योजना तुम्हाला करणार करोडपती! कमी गुंतवणुकीवर मिळणार जबरदस्त परतावा