‘लक्षद्वीप-मालदीव’ प्रकरणी Amitabh Bachchan यांचं मोठं वक्तव्य!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Amitabh Bachchan | देशात सध्या ‘लक्षद्वीप-मालदीव’ प्रकरण चर्चेत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी काही दिवसांपूर्वी लक्षद्वीपला भेट दिली होती. या दौऱ्याचे फोटो त्यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केले होते. मात्र यानंतर मालदीवमधील नव्या सरकारमधील काही नेत्यांनी यावर वादग्रस्त प्रतिक्रिया दिल्याने वाद निर्माण झाला आहे. झाहिद रमीझ या नेत्याने भारत पैसे कमविण्यासाठी श्रीलंका आणि इतर लहान देशांच्या अर्थव्यवस्थेची नक्कल करत असल्याचे म्हणत हा वाद अजूनच पेटवून दिला. यानंतर देशभरातून या प्रकरणावर प्रतिक्रिया उमटल्या.

यावरच आता अभिनेते बिग-बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनीही आपली रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. अमिताभ यांच्यासोबतच क्रिकेटर वीरेंद्र सेहवागनेही या प्रकरणावर नाराजी आपले मत मांडले आहे. वीरेंद्र सेहवागचीच पोस्ट रीपोस्ट करत अमिताभ बच्चन यांनी एक्सवर ‘भारताच्या आत्मनिर्भतेला धक्का पोहचवू नका’, असा इशारा दिला आहे.

Amitabh Bachchan यांचा इशारा

अमिताभ बच्चन यांनी वीरेंद्र सेहवागशी सहमती दर्शवत म्हटले कि, “वीरू पाजी हे आपल्या भूमीसाठी खूप योग्य आहे. आपल्या आमच्या स्वतःच्या गोष्टीच सर्वोत्तम आहेत. मी लक्षद्वीप आणि अंदमानला गेलो आहे आणि ते आश्चर्यकारक आहेत. येथील ठिकाणे अतिशय सुंदर आहेत. येथील पाण्याखालील अनुभव अगदी अविश्वसनीय आहे.आम्ही भारतीय आहोत. आम्ही स्वावलंबी आहोत. आमच्या आत्मनिर्भरतेला हानी पोहोचवू नका. जय हिंद.”, असे रोखठोक मत अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी मांडले आहेत.

तर, क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) म्हटले कि, “उडुपीचे सुंदर समुद्रकिनारे असोत, पोंडीतील पॅराडाईज बीच, अंदमानमधील नील आणि हॅवलॉक आणि आपल्या देशभरातील इतर अनेक सुंदर समुद्रकिनारे असोत, भारतामध्ये अशी अनेक अनपेक्षित ठिकाणे आहेत ज्यांच्याकडे काही पायाभूत सुविधांसह खूप क्षमता आहेत. सर्व ‘आपदा’ या ‘अवसर’मध्ये रूपांतरित करण्यासाठी भारताला ओळखले जाते आणि मालदीवच्या मंत्र्यांनी आपल्या देशाची आणि आपल्या पंतप्रधानांची केलेली टीका ही भारतासाठी पर्यटकांना आकर्षित करून आपल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी तसेच आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी एक उत्तम ‘अवसर'(वेळ) आहे, ” असे वीरेंद्र सेहवाग म्हणाला आहे.

लक्षद्वीप-मालदीव वाद का निर्माण झाला?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीप दौऱ्याची फोटो पोस्ट केल्यानंतर मालदीव (Lakshadweep-Maldives dispute) मधील मंत्र्यांनी टीका करण्यास सुरुवात केली. मोदींच्या लक्षद्वीप भेटीमुळे मालदीवला मोठा फटका बसणार असल्याचे तेथील मंत्री झाहिद रमीझ यांनी म्हटले. यावरच न थांबता त्यांनी “आम्ही जशी सेवा पुरवितो, तशी सेवा लक्षद्वीप देऊ शकते का? ते स्वच्छता पाळू शकतात का? हॉटेलच्या खोल्यामध्ये प्रचंड घाण वास येतो, त्याचे काय करणार?’,असा सवाल करत मोदींवर टीका केली. आणि येथूनच या वादाची सुरुवात झाली. या प्रकरणी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासह अनेक दिग्गजांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या टिकेनंतर सोशल मीडियावर संताप व्यक्त करण्यात आला. यानंतर अनेकांनी बायकॉट मालदीव हि सोशल मोहीम सुरू केली. त्यामुळे सध्या लक्षद्वीप-मालदीव प्रकरण चर्चेत आहे.

News Title- Amitabh Bachchan reaction

महत्त्वाच्या बातम्या- 

Mumbai Crime l मुंबई पोलीस दलात 8 महिला पोलिसांसोबत सेक्स स्कँडलच्या आरोपांनी खळबळ, पत्र पाठवणाराचा शोध सुरु

Lost Your Bank Locker Keys l बँक लॉकरची चावी हरवली तर काय होईल? जाणून घ्या बँकेचे नियम

Ambati Rayudu | 10 दिवसांत राजकारण सोडण्याचं कारण ‘मुंबई इंडियन्स’ – रायुडू

Whatsapp Cyber Crime Alert l अलर्ट : तुम्हाला देखील WhatsApp वर ‘असा’ मेसेज आला आहे? वेळेवर व्हा सावधान अन्यथा…

Maldives India Issue | भारत आमचा विश्वासू मित्र आहे; भारताच्या समर्थनार्थ ‘बांगलादेश’