Neetu Kapoor | याराना, खेल खेल मे, कभी कभी यासोबतच अनेक मोठ्या चित्रपटांत काम करत अजूनही बॉलीवूडमध्ये आपले स्थान कायम राखणाऱ्या अभिनेत्री नीतू कपूर (Neetu Kapoor) यांनी नुकतीच करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण सीजन 8’या (Koffee With Karan Season 8) शो मध्ये हजेरी लावली. नीतू सिंह सोबत अभिनेत्री झीनत अमानही (Zeenat Aman) यावेळी उपस्थित होत्या.
नीतू कपूर (Neetu Kapoor) आणि झीनत अमान यांच्या अपकमिंग एपिसोडचा प्रोमो नुकताच रिलीज झाला आहे. यामध्ये दोन्ही अभिनेत्री एन्जॉय करताना दिसून आल्या. झीनत अमान या त्याकाळी बोल्ड अभिनेत्री म्हणून प्रचलित होत्या. त्यांनी ‘सत्यम शिवम सुंदरम’ या चित्रपटात साकारलेली भूमिका प्रेक्षकांना प्रचंड भावली होती. करण जोहरच्या शोमध्ये त्यांनी आपल्या अनेक आठवणींना उजाळा दिला.
Neetu Kapoor चा मोठा खुलासा
करण जोहरने नीतू कपूरला (Neetu Kapoor) त्यांच्या क्रशबद्दल प्रश्न विचारला. तुझा कुणावर सीक्रेट क्रश आहे का?,या प्रश्नावर अभिनेत्री नीतू कपूर यांनी खुलासा करत शशी कपूर यांचं नाव घेतलं. शशी कपूर हे राज कपूर यांचे भाऊ आणि ऋषी कपूर यांचे काका होते. त्यानुसार बघितलं तर नीतू यांना आपल्या सासऱ्यावरच क्रश असल्याचं समोर आलंय.
View this post on Instagram
झीनत अमान यांनीही आपल्या आयुष्यातील अनेक किस्से सांगितले. झीनत यांनी शोमध्ये आपण पार्टी करत नसल्याचा खुलासा केला. तर, करण जोहरने झीनत यांना आपल्या डेटिंग लाइफबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी स्पष्टपणे प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. तर नीतू यांनीही झीनत अमानशी संबंधित एक किस्सा सांगितला.
Neetu Kapoor कडून झीनत अमान यांचं कौतुक
नीतू कपूर (Neetu Kapoor) यांनी झीनत अमान यांना ‘स्टाईल आणि सेक्सिनेस ची दुकान’म्हटलंय. यासोबतच हिरालाल-पन्नालाल, यादों कि बारात, धरमवीर या चित्रपटांत सोबत काम केल्याचं दोन्ही अभिनेत्रींनी सांगितलं. याचा एपिसोड लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
करण जोहरने त्याच्या सोशल मीडिया हँडलवरून शोचा प्रोमो शेअर करताना लिहिलं आहे की, ‘सुंदर आणि अप्रतिम अभिनेत्री नीतू कपूर आणि झीनत अमान येणार आहेत. हा एपिसोड खूप मनोरंजक असणार आहे.’ करण जोहरने प्रोमो पोस्ट करताच यावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
Malaika Arora | मलायका आणि अर्जुन कपूरचं ब्रेकअप?; अखेर खुलासा झाला
Bilkis Bano प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा गुजरात सरकारला मोठा झटका!
Aprilia RS 457 l बाइकप्रेमींनो… Aprilia RS 457 स्पोर्ट्स बाईक धुमाकूळ घालण्यास सज्ज