“भास्कर जाधव नाच्या आहे, त्याचा मेंदू सडलेला”
रत्नागिरी | भास्कर जाधवला मी दोन कवडीची किंमत देत नाही. तो नाच्या आहे. त्याचा मेंदू सडलेला आहे. असा निच माणूस मी अख्या जगात कुठं पाहिला नाही, अशी जहरी टीका शिवसेना नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्यावर केली.
रामदास कदम (Ramdas Kadam) यांना मी 2009 साली पराभूत केलं आहे. ते रामदास कदम (Ramdas Kadam) ते माझा काय पराभव करणार, असा सवाल भास्कर जाधव यांनी विचारला होता. याला रामदास कदमांनी प्रत्युत्तर दिलंय.
खाल्लेल्या घराचे वासे मोजणारी औलाद म्हणजे भास्कर जाधव, अशी जहरी टीका रामदास कदम यांनी भास्कर जाधव यांच्यावर केली.
शरद पवार यांच्या तुकड्यावर कोण जगतंय हे अख्ख्या देशाला माहिती आहे. असा टोलाही रामदास कदम यांनी भास्कर जाधव यांनी लगावला. ज्याला कावीळ झाली आहे त्याला जग पिवळं दिसतं, अशी टीका रामदास कदम यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
महत्त्वाच्या बातम्या-
Comments are closed.