फाटलेल्या नोटा बदलायच्यात?; ही बातमी नक्की वाचा

नवी दिल्ली | फाटलेल्या चलनी नोटा (Torn notes) प्रत्येक व्यक्तीकडे येतात. अनेकवेळा नोटांच्या ढिगाऱ्यातून फाटलेल्या जुन्या नोटा बाहेर येतात आणि कधी कधी एखादा दुकानदार आपल्याला अशा नोटा देतो.

लोक नोटा बदलणाऱ्या दुकानदारांकडे जाऊन त्यांना काही कमिशन देतात आणि फाटलेल्या नोटा बदलून घेतात. पण तुम्हाला हे करण्याची गरज नाही. तुम्ही बँकेत (Bank) जाऊन फाटलेल्या नोटांऐवजी नवीन नोटा घेऊ शकता.

आरबीआयने एकाच वेळी नोटा बदलण्याची मर्यादाही निश्चित केली आहे. पण तुम्ही कोणत्याही सहकारी बँक, प्रादेशिक बँक आणि ग्रामीण बँकेत नोटा बदलून घेऊ शकत नाही. खासगी बँकांसह राष्ट्रीयीकृत बँकांमध्येही नोटा बदलून घेता येतात. ज्या शाखेत तुम्ही नोटा बदलून घेणार आहात त्या बँकेत खातं असणं आवश्यक नाही.

दरम्यान, 1 व्यक्ती एकावेळी 20 पेक्षा जास्त नोटा बदलून घेऊ शकते. परंतु, या वीस नोटांचे मूल्य 5000 रुपयांपेक्षा जास्त नसावं. 20 च्या नोटा आणि मूल्य 5 हजार रुपयांपेक्षा कमी असल्यास बँक लगेच नोट बदलून देईल. यापेक्षा जास्त रकमेची देवाणघेवाण केल्यास, बँक फाटलेल्या नोटा ठेवेल, परंतु ग्राहकाच्या खात्यात पैसे जमा करेल.

महत्त्वाच्या बातम्या-