मोदींना कोण हरवू शकतं?; गडकरींनी दिलं उत्तर

मुंबई | भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी न्यूज18 इंडियाच्या ‘चौपाल’ कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीवर भाष्य केलं.

2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान मोदींना कुणीही पराभूत करू शकत नाही. क्रिकेट, व्यवसाय आणि राजकारणात काहीही होऊ शकते, मात्र चांगल्या कामामुळे जनता आमच्यासोबत आहे, असं गडकरी म्हणालेत.

2014 पासून आजपर्यंत सरकार आल्यावर 50 लाख कोटींची कामं केली आहे. अजूनीही काम सुरू आहे. मात्र आमच्यावर एकही भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही, असं गडकरींनी म्हटलंय.

मोदी सरकारने प्रत्येक क्षेत्रात चांगलं काम केलं आहे, देशात झालेला बदल हा सरकारच्या कामाचा पुरावा आहे, असं गडकरींनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या-