“बेरोजगारांना दोन वर्षे दरमहा 3000 रुपये भत्ता देणार”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | कर्नाटकात जर काँग्रेस पक्ष सत्तेवर आला तर बेरोजगारांना दोन वर्षे दरमहा 3000 रुपये भत्ता देणार असल्याची घोषणा काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केली आहे. बेळगावमध्ये झालेल्या सभेमध्ये त्यांनी ही घोषणा केली आहे.

बेरोजगारी कमी करण्यासाठी केंद्र सरकार काहीही करत नाही. त्यामुळेच काँग्रेस पक्ष बेरोजगार पदवीधरांना दोन वर्षांसाठी दरमहा 3,000 रुपये आणि पदविकाधारकांना दोन वर्षांसाठी 1,500 रुपये प्रति महिना देणार आहे, असं राहुल गांधींनी सांगितलं.

राज्यात काँग्रेसचे सरकार आल्यास दहा लाख तरुणांना रोजगार दिला जाईल आणि अडीच लाख सरकारी पदेही भरली जातील, अशी मोठी घोषणा राहुल गांधी यांनी केली.

महिलांना दरमहा दोन हजार रुपये आणि गरीब कुटुंबांना दहा किलो तांदूळ देणार असल्याचंही ते म्हणाले. कर्नाटकमधील भाजप सरकार हे देशातील सर्वात भ्रष्ट सरकार आहे, अशी टीकाही त्यांनी केलीये.

महत्त्वाच्या बातम्या-