मोठी बातमी! भाजप खासदार गिरीश बापट यांचं निधन

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

पुणे | भाजपचे पुण्यातील खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांचं निधन झालं आहे. ते 72 वर्षांचे होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू होते. गिरीश बापट यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून आणि नात असा परिवार आहे.

गिरीश बापट गेल्या दीड वर्षांपासून आजाराशी झुंजत होते. त्यांच्यावर उपचारही चालू होते. मात्र, तरीदेखील कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत गिरीश बापट एका मेळाव्यात सहभागी झाले होते.

गिरीश बापट यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खालावली होती. परंतु त्यांच्यांवर घरीच उपचार सुरु होते. बुधवारी त्यांची प्रकृती अधिकच खालावली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यांवर डॉक्टरांनी उपचार सुरु केलं होतं. परंतु उपचार सुरु असताना त्यांचं निधन झालं.

गिरीश बापट हे मूळचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. जनसंघापासून ते राजकारणात उतरले. नगरसेवक पदापासून सुरुवात केलेले गिरीश बापट 1995 पासून सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रसेच्या मोहन जोशी यांना पराभव करत त्यांनी लोकसभा गाठली होती.

महत्त्वाच्या बातम्या-