नवी दिल्ली | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shaha) यांनी नेटवर्क 18 च्या कार्यक्रमात त्यांची भूमिका मांडली. नेटवर्क 18 चे एडिटर इन चीफ राहुल जोशी यांनी अमित शाह यांची मुलाखत घेतली. यावेळी अमित शहांनी (Amit Shaha) काँग्रेसवर गंभीर आरोप केले.
काँग्रेसने (Congress) केंद्रीय एजन्सीचा कसा गैरवापर केला, एका खोट्या गुन्हात नरेंद्र मोदींना अडकवण्याचा कसा डाव होता यावर त्यांनी गौप्यस्फोट केला आहे.
तपास एजन्सी त्यांची चौकशी करत असताना सीबीआय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुजरातमधील एका कथित बनावट चकमक प्रकरणात अडकवण्यासाठी अमित शाह यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या काळातील ही घटना असल्याचं अमित शहांनी सांगितलं.
काँग्रेस सरकारच्या काळात कथित बनावट चकमक प्रकरणात नरेंद्र मोदी यांना अडकवण्यासाठी सीबीआय माझ्यावर दबाव आणत होती. त्यावेळी ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. तुम्ही टेन्शन घेऊन नका तुम्ही नरेंद्र मोदींचं नाव सांगून टाका असं त्यावेळी मला सांगण्यात आलं होतं. त्यासाठी माझ्यावर दबाव आणला जात होता, असं ते म्हणालेत.
महत्त्वाच्या बातम्या