मुंबई | महाराष्ट्र सरकार (Maharashtra Goverment) हे बिनकामाचं आणि नपुंसक आहे हे मी म्हणत नाही तर कोर्टाने म्हटलं आहे तसंच जनताही म्हणते आहे. जेव्हापासून हे सरकार स्थापन झालं आहे तेव्हापासून या सरकावर टीका करणाऱ्या अनेक उपाध्या लागल्या आहेत असं खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटलं आहे.
वादग्रस्त भाषणांविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले नसल्याचा आरोप करत महाराष्ट्रासह अन्य काही राज्यांच्या प्रशासकीय यंत्रणांविरोधात दाखल अवमान याचिकांवर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने महाराष्ट्र सरकारच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले. यावरूनही संजय राऊतांनी शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य केलंय.
महाराष्ट्रात विविध कारणांमुळे जातीय तेढ वाढावी, दंगली व्हाव्यात, राज्यातलं वातावरण अस्थिर रहावं असं काम हे सरकार करतं आहे असाही आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
गृहमंत्री किंवा गृहमंत्रालय महाराष्ट्रात अस्तित्त्वात आहे का? हाच प्रश्न आहे. देवेंद्र फडणवीस अत्यंत निराश आणि वैफल्यग्रस्त अवस्थेत काम करत आहेत. याची कारणं शोधावी लागतील. ती कारणं जाहीरपणे सांगण्यासारखी नाहीत. त्यांच्या चेहऱ्यावरच निराशा दिसून येते. बुधवारीही संभाजी नगरला जी परिस्थिती निर्माण झाली ही सरकारचं अपयश आहे, असं ते म्हणालेत.
महत्त्वाच्या बातम्या-