राजस्थान रॉयल्सला आज बंगळुरू देणार टक्कर; कोण मारणार बाजी?

RCB VS RR | राजस्थान रॉयल्सचा आज (6 एप्रिल)रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध सामना होईल. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर हा सामना खेळवला जाईल. राजस्थानला घरच्या मैदानाचा फायदा होईल. त्यांनी या मोसमात जयपूरमध्ये दोन सामने खेळले आहेत आणि त्या दोन्हीमध्ये विजय मिळवला आहे. राजस्थानचा मागच्या सामन्यात मुंबईने पराभव केला.

दुसरीकडे बंगळुरू संघ चार सामन्यांत एका विजयासह गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे, तर राजस्थान सहा गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यात बंगळुरू विजयाच्या निर्धाराने मैदानात उतरेल. बंगळुरूकडे कर्णधार फाफ डु प्लेसी, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरुन ग्रीन, रजत पाटीदार हे स्टार खेळाडू संघात आहेत. पण यापैकी एकालाही मोठी खेळी करता आलेली नाही.

RCB VS RR सामना

विराट कोहली सोडता यांनी कुणीच प्रभावी कामगिरी अद्याप केली नाही. त्यामुळे विजय प्राप्त करायचा झाल्यास या खेळाडूंना कामगिरी उंचवावी लागेल. विराटने दोन अर्धशतकांसह 203 धावा फटकावल्या आहेत. विराट याच्या एकट्याच्या जीवावर बंगळूरला जिंकता येणार नाही हेही तितकंच खरं आहे. त्यामुळे बंगळुरूला सांघिक कामगिरीकडे लक्ष द्यावे लागणार आहे.

राजस्थानकडून कर्णधार संजू सॅमसन व रियान पराग या दोन फलंदाजांव्यतिरिक्त त्यांच्या संघातील फलंदाजांना मोठी खेळी करता आलेली नाही. यशस्वी जैस्वाल व जॉस बटलर या सलामीवीरांकडून सपशेल निराशा झाली आहे. त्यामुळे राजस्थानला देखील कामगिरीकडे लक्ष द्यावे लागेल.

RCB VS RR संभाव्य प्लेयिंग 11

राजस्थान रॉयल्स (RR) संभाव्य प्लेयिंग इलेव्हन संघ : यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (C&WK), रियान पराग, रविचंद्रन अश्विन, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, ट्रेंट बोल्ट, नांद्रे बर्गर, युझवेंद्र चहल, आवेश खान.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संभाव्य प्लेयिंग इलेव्हन संघ : फाफ डू प्लेसिस (C), विराट कोहली, रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, अनुज रावत, दिनेश कार्तिक (WK), मोहम्मद सिराज, यश दयाल, मयंक डागर, रीस टोपले.

News Title- RCB vs RR Today IPL 2024 Match

महत्त्वाच्या बातम्या –

पैसे मोजताना ‘ही’ चूक करत असाल तर थांबा, अन्यथा…

‘रामायण’मध्ये दिसणार ‘हे’ कलाकार?; फोटो सोशल मीडियावर व्हायरल

लग्न कधी करणार?; पूजा भट्टने अखेर उत्तर दिलं

शरद पवार गटाचा ‘हा’ उमेदवार संकटात; उमदेवारी जाहीर होताच मोठी कारवाई

मनोज जरांगे पाटलांचं एक पाऊल पुढे; केली ‘ही’ मोठी घोषणा