“दिल्लीतरी अतिशय गाढव मुलगा काहीतरी बरळतो”

मुंबई | दिल्लीतील एक मूर्ख मुलगा काहीतरी बरळतो, त्यानंतर आपण जागे होतो. त्यामुळे त्या वेड्या मुलाचे मी आभार मानतो, अशी टीका अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी नाव न घेता काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर केली आहे.

शरद पोंक्षे यांनी मनसेच्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील ‘जयोस्तुते’ या व्याख्यानमालेत राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर हे नाव दर दोन-तीन महिन्यांनी आपल्याला न्यूज किंवा इतर माध्यमांतून ऐकायला येतं. कुणीतरी दिल्लीतला गाढव आणि मूर्ख मुलगा काहीही बडबडतो, पण त्याचे मी आभार मानतो कारण त्या मुर्खामुळे थंड असणारा हिंदू समाज जागृत होत आहे. आपल्याला फार वेळ लागतो आणि एकदा का वाद पेटले, की मग आपण कोणाला ऐकत नाही, असं पोंक्षे म्हणालेत.

अहिंसेच्या अतिरेकामुळे लोक छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीर बोलण्यावर वाद निर्माण करत आहेत. ज्या व्यक्तीला आपल्या आजीचा इतिहास माहिती नाही त्याला सावरकरांचा इतिहास काय माहिती असणार, असा टोलाही पोंक्षेंनी लगावला आहे.

महापुरुषांबद्दल कोणी अवाक्षर काढू नये अशी सामान्य माणसांची दहशत व्हायला हवी आणि निवडणुकीच्या माध्यमातून नागरिकांनी ही दहशत दाखवून द्यायला हवी, असं ते म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या-