फिल्मसिटी उत्तर प्रदेशात जाणार?, योगी आदित्यनाथ यांची स्पष्ट भूमिका

मुंबई | उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ(Yogi Adityanath) हे गुरूवारी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) आणि उद्योग क्षेत्रातील अनेकांची भेट घेतली आहे. त्यातच त्यांनी सिनेसृष्टीतील काही महत्वाच्या व्यक्तींचीही भेट घेतल्याच्या चर्चा आहेत.

यावरून शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर हल्लाबोल केला आहे. योगी आदित्यनाथ फिल्म इंडस्ट्री(Film Industry) घेऊन जाऊ शकत नाही. त्यांनी सिनेमा वाढवण्यासाठी प्रयत्न करावा. त्यामुळं देशाच्या विकासासाठी मदत होईल, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

राऊतांना उत्तर देताना योगी आदित्यनाथ यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. मुंबई देशाच्या अर्थव्यवस्थेची भूमी आहे.मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे तर उत्तर प्रदेश धार्मिक राजधानी आहे, असं योगी आदित्यनाथ म्हणाले आहेत केले आहे.

आम्ही उत्तर प्रदेशात स्वत:ची फिल्म इंडस्ट्री उभारणार आहोत. मुंबईतून फिल्म इंडस्ट्री नेण्याचा आमचा कोणताही डाव नाही, असं म्हणत त्यांनी मुंबई फिल्म सिटी उत्तर प्रदेशात नेण्याच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-