बाबो ऋषभ पंतला पाहायला उर्वशी पोहचली रूग्णालयात?

मुंबई | गेल्या आठवड्यात भारतीय क्रिकेट टीमचा(India Cricket Team) स्टार खेळाडू ऋषभ पंत(Rishabh Pant) याचा गंभीर अपघात झाला आहे. सध्या तो मुंबईतील ‘कोकिलाबेन धिरूभाई अंबानी’ या रूग्णालयात उपचार घेत आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.

पंतच्या अपघाताचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अनेकजण कमेंट्सच्या, पोस्टच्या माध्यमातून पंत लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत होते. परंतु या सर्वात नेटकऱ्यांचं लक्ष उर्वशी रौतेलाच्या (Urvashi Rautela) पोस्टकडं लागलं होतं.

पंतचा अपघात झाला तेव्हाही उर्वशीनं तिचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिलं की, ‘प्रार्थना’. उर्वशीनं पंत बरा व्हावा यासाठी तिनं ‘प्रार्थना’ असं लिहिलं आहे, असा अंदाज नेटकऱ्यांनी लावला होता.

या सगळ्या चर्चा सुरू असतानाच आता उर्वशीनं पंत ज्या रूग्णालयात आहे त्या रूग्णालयचा फोटो शेअर केला आहे. तिच्या या पोस्टनंतर तर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत उर्वशीला चागलंच घेरलं आहे. काहीजण उर्वशी पंतला भेटायला गेली होती असा अंदाजही लावत आहेत.

दरम्यान, उर्वशी आणि पंत यांच्यातील हा वाद आता नवीन नाही. उर्वशीनं बऱ्याचदा अशा पोस्ट करत नेटकऱ्यांना विचार करायला भाग पाडलं आहे.

महत्वाच्या बातम्या-