‘संभल जा, अभी भी टाईम है’; सुषमा अंधारेंचा ‘या’ नेत्याला इशारा

मुंबई | वॉरंट बेल आहे बेटा. श्रीकांत संभल जा. अभी भी टाईम है, असा सल्ला शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी खासदार श्रीकांत शिंदेंना दिला आहे.

सुषमा अंधारे यांची कल्याणमध्ये प्रबोधन यात्रा झाली यावेळी त्यांनी शिंदे गट आणि भाजपवर टीका करण्याची संधी सोडली नाही.

भाजप नेते अनुराग ठाकूर यांनी कल्याण मतदार संघात लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे श्रीकांत शिंदे यांच्या अडचणी वाढू शकतात किंवा त्यांना येत्या निवडणुकीत मोठा फटका बसू शकतो. याच पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे यांनी श्रीकांत शिंदे यांना सावध करत निशाणा साधला आहे.

सत्तेच्या स्वार्थासाठी तुम्ही तिकडे गेला. पण तुमच्या हातात सत्ता राहणार नाही. कारण भाजपने तुम्हाला फक्त सत्तेचं गाजर दाखवलं आहे. त्यामुळे आता श्रीकांत शिंदे यांच्या खबऱ्यांनी कामे चोख पार पाडावीत, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे.

भाजप नेत्यांकडून वारंवार महापुरुषांचा अवमान केला जात आहे. यावरूनही सुषमा अंधारे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

भाजपा आणि टीम देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गेले काही महिन्यांपासून महापुरुषांचा अवमान, महाराष्ट्राची अस्मिता पायदळी तूडवण्याचा प्रयत्न होतोय, असंही ते म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या-