“महाराष्ट्रातून गुजरातला पळवलेले उद्योग फळाला आले”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | सध्या गुजरात विधासभा निवडणुकीच्या निकालाची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. गुजरातमध्ये भाजप(BJP) 182 जागांपैकी 156 जागांवर आघाडीवर आहे.

केंद्रीय मंत्री अमित शाह(Amit Shah) यांनी यावेळी गुजरातमध्ये भाजप रेकाॅर्डब्रेक विजय मिळवेल, असा दावा केला होता. तो शाह यांचा दावा खरा ठरला आहे. त्यामुळं गुजरातमध्ये भाजपचा मोठा जल्लोष सुरू आहे.

गुजरातमध्ये भाजपला मिळालेल्या यशानंतर अनेक राजकीय नेत्यांनी भाजप आणि मोदींच अभिनंदन केलं. त्यातच उद्धव ठाकरेंनीही(Uddhav Thackeray) भाजपचं आणि मोदींचं अभिनंदन करत मोदींना टोमणा मारल्यानं सोशल मीडियावर अनेक चर्चा रंगल्या आहेत.

उद्धव ठाकरे म्हणाले की, गुजरातमध्ये भाजपला दणदणीत विजय मिळाला, त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) आणि भाजपचे मनापासून अभिनंदन. गुजरातला पळवलेले उद्योग फळाला आले, असा टोमणाही त्यांनी यावेळी भाजपला लगावला.

हिमाचल प्रदेशमध्ये काॅंग्रेस आघाडीवर असल्यानं ठाकरेंनी काॅंग्रेसचं अभिनंदन केलं. तसेच दिल्ली मनपा निवडणुकीत आम आदमी पक्षाला मिळालेल्या विजयाबद्दल ठाकरेंनी अरविंद केजरीवाल(Arvind Kejriwal यांंचंही अभिनंदन केलं.

आता ठाकरेंच्या या टोमण्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) यांनी प्रत्त्युत्तर दिलं आहे. फडणवीस म्हणाले की, ठाकरेंकडं टोमणेअस्त्र आहे. जे ब्रम्हास्त्रापैकी गतीमान आहे. ठाकरेंना कोणतंही वाक्य टोमण्याशिवाय पूर्ण होत नाही, हे परत एकदा स्पष्ट झालं आहे, असंही फडणवीस म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-