Taapsee Pannu | तापसी पन्नूचा सर्वांत मोठा खुलासा; म्हणाली, “10 वर्षांपासून एकाच..”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Taapsee Pannu | ‘डंकी’ या चित्रपटात आपल्या अभिनयाने घायाळ करणारी अभिनेत्री तापसी पन्नूने (Taapsee Pannu) सर्वांत मोठा खुलासा केला आहे. तापसीने आपल्या लव्ह लाईफबद्दल मोठं भाष्य केलं आहे. एका मुलाखतीत तीने आपल्या बॉयफ्रेंडबद्दल सांगितलं. तसेच गेल्या दहा वर्षांपासून आम्ही डेट करत असल्याचंही ती म्हणाली.

शाहरुख खानसोबत तापसीने नुकताच ‘डंकी’ हा चित्रपट केला. बॉक्स ऑफिसवर डंकी जास्त प्रभाव पाडू नाही शकला. मात्र, तापसी आणि शाहरुखचा अभिनय अनेकांना भावला. आता तापसी आपल्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आली आहे.

Taapsee Pannu चा मोठा खुलासा

तापसी पन्नू (Taapsee Pannu) बॅडमिंटनपटू मॅथियस बोए सोबत डेट करत आहे. याबाबत दोघांनीही अद्याप अधिकृतरित्या काहीच सांगितले नाही. मात्र, नुकत्याच एका मुलाखतीत तीने आपल्या पर्सनल लाईफबद्दल अनेक खुलासे केले. तिला सेलिब्रिटी बनल्यानंतर डेट करणं अवघड होऊन जाते का?, असा प्रश्न करण्यात आला होता. यावर उत्तर देताना तापसी म्हणाली की, ” मला याबाबत माहीत नाही.पण, मी गेल्या दहा वर्षांपासून एकाच व्यक्तीसोबत आहे. मी तेरा वर्षांपुर्वी फिल्मी दुनियेत प्रवेश केला. जेव्हा मी बॉलीवूडमध्ये डेब्यू केला तेव्हा माझी भेट त्या व्यक्तीशी झाली, असं तापसी म्हणाली.

तसेच पुढे बोलताना ती म्हणाली की, ‘मला त्याला सोडण्याचा किंवा इतर कुणासोबत जाण्याचा कोणताही विचार नाहीये. मी माझ्या नात्यात खूप आनंदी आहे.’, तापसीच्या या विधानाची आता जोरदार चर्चा होत आहे. मात्र तीने लग्नाबाबत कोणतंही भाष्य केलं नाही. तापसी व मॅथियस दोघेही सध्या लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये आहेत.

“मी अजून तरी गरोदर नाही, म्हणून..”

काही दिवसांपूर्वीच तापसीने (Taapsee Pannu) आपल्या इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी एनिथिंग’ सेशन ठेवले होते. तेव्हा तिला एका युजरने लग्नाबाबत प्रश्न विचारला होता. यावर तापसीने, “मी अजून तरी गरोदर नाही. त्यामुळे सध्या माझा लग्नाचा विचार नाही. जेव्हा मी लग्न करेल तेव्हा नक्कीच कळवेल. माझ्या लग्नाचा सोहळा खूप मोठा नसणार. मला जेव्हा मुलं हवे असतील तेव्हाच मी लग्न करेल.”, असं उत्तर तापसीने दिलं होतं.

या उत्तरानंतरही तापसीच्या लग्नाबाबत बोललं गेलं. आता एका मुलाखतीत तीने लग्नाबाबत स्पष्ट भाष्य केलं आहे. त्यामुळे सध्या तरी तापसी आणि तिचा बॉयफ्रेंड आनंदी असून रिलेशशिपमध्येच आनंदी असल्याचं दिसतं आहे. तापसीने बॉलीवूडमध्ये ‘चश्मे बद्दूर’ या चित्रपटाद्वारे एंट्री केली होती. यानंतर तीने थप्पड, हसीना दिलरुबा, जुडवा 2 आणि डंकी या मोठ्या चित्रपटात काम केलं आहे.

News Title- Taapsee Pannu biggest revelation

महत्वाच्या बातम्या- 

गुंतवणूकदारांना Share Market तज्ज्ञांचा सल्ला; ‘हा’ स्टॉक बनेल रॉकेट

Ram Mandir l 22 जानेवारीला कुठल्या राज्यांनी दिली सुट्टी, महाराष्ट्रात पण सुट्टी देणार?, मोठी बातमी

Rohit Sharma ला भारतीय संघातून काढून टाकणार होते, मात्र… मोठी बातमी आली समोर

शेतकऱ्याच्या पोरानं करून दाखवलं; MPSC परिक्षेत विनायक पाटील राज्यात पहिला आला

Indian Women Hockey Match l MS Dhoni मॅच पहायला पोहोचला आणि भारतीय संघ हारला!