PM Narendra Modi | सोलापूरकरांसमोर नरेंद्र मोदींना अश्रू अनावर, म्हणाले…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात होते. महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात मोदींच्या हस्ते काही प्रकल्पाचं भूमिपूजन झालं. मागच्या आठवड्यातही मोदी मुंबई आले होते. त्यांच्या हस्ते अटल सेतू या पुलाचं उद्घाटन करण्यात आलं होतं. आता मात्र पुन्हा एकदा मोदी महाराष्ट्रमध्ये आले आहेत. सोलापूरमध्ये नरेंद्र मोदी यांचा कार्यक्रम पार पडला.

भाषणा दरम्यान मोदी भावूक 

नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. मोदींच्या दौऱ्याला लाखो लोक उपस्थित होते. पीएम आवास योजने अंतर्गत देशातील सर्वात मोठ्या सोसायटीचं लोकार्पण आज सोलापुरात झालं.  भाषणात मोदी काय बोलणार? याकडे जनेतेचं लक्ष लागलं होतं. मात्र, बोलत असताना मोदींना आश्रू आनवार झाले. यावेळेस त्यांचा कंठ दाटून आला होता.

काय घडलं नेमकं?

पीएम आवास योजनेतंर्गत आज सर्वात मोठ्या सोसायटीचं लोकार्पण झालं. जर मला लहानपणी अशा घरात रहायला मिळाल असतं तर?. हे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) डोळ्यात अश्रू तरळले. काही सेकंद ते थांबले. त्यांचा कंठ दाटून आला होता, त्यावेळी मोदी म्हणाले की, “आज मी या गोष्टी पाहतो, तेव्हा मनाला समाधान मिळतं. हजारो कुटुंबाचं स्वप्न साकार होत आहे.

पुढे ते म्हणाले की, आज देशातील 4 ते 5 कोटी जनतेला आम्ही पक्क घर देऊ शकलो. या जनतेला किती आनंद झाला आहे हे तेच सांगतील. देशात दीर्घकाळपर्यंत गरीबी हटाव नारे लावले गेले. परंतु गरीबी गेली नाही. कारण गरीबांच्या नावावर योजना होत होत्या.

मात्र त्याचा लाभ योग्य लाभार्थीला मिळत नव्हता. म्हणजे आधी सरकारची नीती, निष्ठा आरोपीच्या पिंजऱ्यात होती. परंतु आता तुम्ही बघितलेले दिवस तुमच्या मुलांना बघायला मिळणार नाही. झोपडीऐवजी आता पक्के घरात तुम्हाला राहण्यास मिळणार आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

22 तारखेला रामज्योत लावायची

सभेत बोलत असताना मोदींनी जनतेला आवाहन केलं आहे. यावेळेस ते म्हणाले की 22 जानेवारी रोजी भगवान राम आपल्या भव्य मंदिरात विराजमान होणार आहे. संताच्या मार्गदर्शनाखाली मी यम नियमांचं कठोर पालन करत आहे. 22 तारखेला संध्याकाळी सर्वांनी घराघरात रामज्योती लावावी.

News Title | Pm narendra modi gets emotional while talking

महत्त्वाच्या बातम्या-

Google Chrome ने बदलली पॅालिसी, आता अशाप्रकारे सर्च केलं तर खासगी राहणार नाही!

Jallikattu Bull | शर्यतीच्या बैलाला जबरदस्ती खाऊ घातला कोंबडा, 3 जणांवर मोठी कारवाई

गुंतवणूकदारांना Share Market तज्ज्ञांचा सल्ला; ‘हा’ स्टॉक बनेल रॉकेट

Ram Mandir l 22 जानेवारीला कुठल्या राज्यांनी दिली सुट्टी, महाराष्ट्रात पण सुट्टी देणार?, मोठी बातमी

Rohit Sharma ला भारतीय संघातून काढून टाकणार होते, मात्र… मोठी बातमी आली समोर