Pune News | अदानी कंपनीचं पुणेकरांना मोठं गिफ्ट!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Pune News | पुणेकरांच्या सोयीसाठी पीएमपीएल कायम सेवेत असते. पुणेकरांचा प्रवास पीएमपीएलने सुरु असला तरी मात्र सरकारने त्यांच्या भेटीला मेट्रो आणली आहे. त्यामुळे पुणेकरांचा कल मेट्रो आणि पीएमपीएल बस या दोघांकडे तितकाच आहे.

दरम्यान, पुण्याच्या अनेक ठिकाणाहून इलेक्ट्रीक बसेस धावताना दिसत असतात. त्या प्रमाणात डिझेलच्या बसेस कमी होत असतानाचं चित्र पाहायला मिळतंय. याच पार्श्वभूमीवर पुणेकरांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

अदानी कंपनीचं पुणेकरांना मोठं गिफ्ट!

पुणेकरांच्या (Pune News) सेवेत असलेली पीएमपीएलने आपल्या ताफ्यातील डिझेल बसेस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. डिझेल बसच्या जागी आता  नवीन इलेक्ट्रीक बसेस येणार असल्याचं समोर येत आहे. शिवाय, गुगलवर पीएमपीची बस सध्या कुठे आहे? हे देखील कळणार आहे. हे सर्व करताना पीएमपीएमएलने उत्पन्न वाढीचे मार्ग शोधले आहे. आता उद्योजक गौतम अदानी यांच्या कंपनीसोबत पीएमपीएमएलने करार केला आहे. त्याचा फायदा पीएमपीएमएल होणार असून उत्पन्न वाढणार आहे.

Pune News | काय फायदा होणार?

पीएमपीएलने आणि अदानी करारातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा 32.5% वाटा पीएमपीएमएल (Pune News) प्रशासनाला मिळणार आहे. यामुळे पीएमपीएमएल उत्पन्न वाढीसाठी हा प्रकल्प फायदेशीर ठरणार आहे. यामुळे पीएमपीएमएलची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होणार आहे. पुणे शहरात अधिक चांगल्या सुविधी मंडळाकडून यानंतर मिळू शकणार आहे.

पीएमपीएलने कोणता करार केला?

अदानीच्या कंपनीने पुण्यात गुंतवणूक केली आहे. त्यासाठी पीएमपीएमएलकडून नवीन मार्ग शोधण्यात आले आहेत. आर्थिक तोट्यात असलेल्या पीएमपीएमएल प्रशासनाकडून नवी गुंतवणूक केली आहे. पीएमपीएमएलच्या उत्पन्न वाढीसाठी प्रशासनाकडून नवे चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात एकूण 7 ठिकाणी चार्जिंग स्टेशन्स उभारण्यात येणार आहेत. त्यातील एकूण 4 ठिकाणी चार्जिंग स्टेशन्स उभारण्यात अदानी कंपनीकडून सुरुवात झाली आहे. पीएमपीएमएलचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक सचिंद्र प्रताप सिंह यांनी काही महिन्यांपूर्वी अनेक बदल केले होते.

News Title : pune news adani to give seven charging station

महत्त्वाच्या बातम्या-

Rohit Pawar | सर्वात मोठी बातमी! रोहित पवारांना ईडीचा झटका

Student Niamh Hearn | रोज पार्ट्या करुन करुन तरुणी होत चालली होती जाड, एके दिवशी अचानक…

Google Chrome ने बदलली पॅालिसी, आता अशाप्रकारे सर्च केलं तर खासगी राहणार नाही!

Jallikattu Bull | शर्यतीच्या बैलाला जबरदस्ती खाऊ घातला कोंबडा, 3 जणांवर मोठी कारवाई

गुंतवणूकदारांना Share Market तज्ज्ञांचा सल्ला; ‘हा’ स्टॉक बनेल रॉकेट