टाटाची सर्वात स्वस्त असेलेली इलेक्ट्रिक एसयूव्ही कार बाजारात घालणार धुमाकूळ

मुंबई | सध्या पेट्रोल-डिझेलचे(Petrol-Diesel Rate) वाढते दर पाहून अनेकजण इलेक्ट्रिक वाहनांना पसंती देत आहेत. त्यामुळं दिवसेंदिवस इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ वाढत आहेत.

त्यातत ऑटो कंपन्याही एकसे बढकर एक अशा इलेक्ट्रिक कार(Electric Car) लाॅंच करत आहेत. त्याचत तुम्ही जर स्वस्तात मस्त अशी इलेक्ट्रिक कार घेण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्वाची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार टाटा कंपनी लवकरच टाटा पंचचे इलेक्ट्रिक माॅडेल ईवी लाईनअपमध्ये समाविष्ट करण्याच्या तयारीत आहे. त्यानुसार कंपनी टाटा पंच ईवी कार(Tata Punch EV) 2023 मध्ये भारतीय बाजारात लाॅंच करू शकते, असा अंदाज आहे.

टाटाची ही एसयूव्ही कार एकदा चार्ज केल्यावर तुम्ही 200 ते ३०० किमी पर्यंतचा प्रवास करू शकता. तसेच या कारमध्ये जलद चार्ज होण्याची क्षमता आहे. या कारचे सर्वात जबरदस्त फीचर्स म्हणजे ही भारतातील पहिली इलेक्ट्रिक कार असणार आहे जी ALFA फ्लॅटफाॅर्मवर आधारित असेल.

या कारची एक्स शोरूम किंमत 10 लाख रूपयांपासून सुरूअसणार आहे. ही कार देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार ठरू शकते, असा अंदाज आहे.

महत्वाच्या बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More