“राहुल गांधींनी 2024 ला पंतप्रधान व्हावं”

नवी दिल्ली | काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली काँग्रेसची भारत जोडो यात्रा हरियाणापाठोपाठ आता देशाची राजधानी दिल्लीत पोहोचली आहे. याबाबत पक्षाच्या नेत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. अशात राहुल गांधी यांनी 2024 मध्ये पंतप्रधान व्हावं, असं काँग्रेस नेता पवन खेडा (Pavan Kheda) म्हणालेत.

2024 मध्ये राहुल गांधी पंतप्रधान होतील का, असा प्रश्न काँग्रेस नेते पवन खेरा यांना विचारण्यात आला तेव्हा त्यांनी यावर उत्तर दिलं.

2024 च्या निवडणुकीत याचा निर्णय होईल. हे 2024 मध्येच ठरवलं जाईल, पण तुम्ही आम्हाला विचाराल तर राहुल गांधी नक्कीच पंतप्रधान व्हायला हवेत, असं त्यांनी म्हटलंय.

अलीकडेच केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी राहुल गांधी आणि अशोक गेहलोत यांना पत्र लिहून कोविड मार्गदर्शक तत्त्वांचं पालन करावं किंवा प्रवास थांबवावा म्हटलं होता. यावरून खेडा यांनी भाजपला घेरलं आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्री राहुल गांधींना पत्र लिहित आहेत, पण त्यांच्या पक्षाचे लोक रॅली काढत आहेत. नियम सर्वांसाठी बनवले पाहिजेत, पण भाजप फक्त राहुल गांधींसाठीच नियम बनवत आहे, असं पवन खेडा म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या-