शिंदे- राज ठाकरेंच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात खळबळ
नागपूर | सध्या हिवाळी अधिवेशन सुरू असल्यानं अनेक राजकीय नेते नागपूर दौऱ्यावर आहेत. त्यातच शुक्रवारी मनसे(MNS) प्रमुख राज ठाकरेही(Raj Thackeray) नागपूर दौऱ्यावर होते.
दौऱ्यादरम्यान, राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची(Eknath Shinde) सदिच्छा भेट घेतली. या भेटीनंतर सोशल मीडियावर विविध चर्चांणा उधाण आलं आहे. मात्र या भेटीवेळी शिंदे-ठाकरेंमध्ये कोणत्या विषयावर चर्चा झाली, हे मात्र अद्याप स्पष्ट झालं नाही.
भेटीदरम्यानचे काही फोटो शिंदेंच्या फेसबुक अकाऊंटवर पोस्ट करण्यात आले आहेत. तसेच भेटीदरम्यान विधिमंडळातील कामकाजासह अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली, असंही या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
राज ठाकरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) यांच्या भेटीलाही जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच अन्य काही मंत्र्यांच्या आणि नेत्यांच्या भेटी राज ठाकरे घेणार आहेत.
दरम्यान, राज ठाकरेंनी शिंदेंची भेट घेतल्यानं आणि त्यांचा नागपूरातील मुक्काम वाढल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
महत्वाच्या बातम्या-
Comments are closed.