सरकारची ही योजना तुम्हाला बनवेल करोडपती; आजच करा गुंतवणूक

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | केंद्र सरकारकडून(Central Goverment) आणि राज्य सरकारकडून(State Goverment) जनतेच्या कल्याणासाठी अनेक योजना(Yojana) राबवल्या जातात. परंतु अनेकांना या योजनेबद्दल फारसे माहित नसते. म्हणूनच आता आम्ही तुम्हाला सरकारच्या एका खास योजनेबद्दल सांगणार आहे, ज्याद्वारे तुम्ही करोडपती बनू शकता.

सरकारची एक ‘पब्लिक प्राॅव्हिडेंट फंड’ (PPF) नावाची स्किम आहे, ज्याला आपण मराठीमध्ये ‘सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी’ असे म्हणतो. चला तर मग जाणून घेऊयात या योजनेत कसं सहभागी व्हावं.

यासाठी तुम्हाला पीपीएफ खाते पोस्ट ऑफीसमध्ये किंवा राष्ट्रीय बॅंकेत उघडावं लागेल. सध्या काही खाजगी बॅंकेतही ही सुविधा आहे. यानंतर तुम्हाला या बॅंकेत वर्षाला दीड लाख रूपये गुंतवणूक करण्याची आवश्यकता आहे.

पीपीएफ अकाऊंटचा कालवधी हा पंधरा वर्षांचा असतो. म्हणजे तुमची रक्कम तुम्हाला व्याजासह पंधरा वर्षानंतर परत मिळते. परंतु काही कठिण परिस्थीतीत तुम्ही पाच वर्षातही ही रक्कम परत घेऊ शकता.

पीपीएफ खात्याचा व्याजदर प्रत्येक वर्षी केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाद्वारे निश्तिक केला जातो. या पीपीएफ योजनेचा फायदा असा आहे की, तुम्हाला निवृत्तीच्या नंतर करमुक्त उत्पन्न मिळू शकते. तसेच खाते चालू केल्यापासून तुम्हाला तिसऱ्या ते पाचव्या वर्षानंतर तुम्ही जमा केलेल्या रकमेवर कर्ज घेता येते.

दरम्यान, तुम्ही जर तुमच्या उज्वल भविष्याचा विचार करत असाल तर गुंतवणूक करण्यासाठी तुमच्यासाठी ही योजना उत्तम आहे.

महत्वाच्या बातम्या-