पक्ष उभारणीसाठी जीवाचं रान करा, खचून जाऊ नका- राज ठाकरे

नागपूर | सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे. त्यामुळं अनेक राजकीय नेते नागपूर दौऱ्यावर आहेत. त्यातच मनसे(MNS) प्रमुख राज ठाकरेही(Raj Thackeray) नागपूर दौऱ्यावर आहेत. दौऱ्यादरम्यान त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला आहे. यावेळी राज ठाकरे म्हणाले की, पक्षाच्या उभारणीसाठी जीवाचं रान करावं लागतं. काॅंग्रेसच्या(Congress) नेत्यांनीही खूप संघर्ष केला. बाळासाहेब ठाकरेंनीही(Balasaheb Thackeray) खूप संघर्ष केला. शिवसेना(Shivsena) 19566 ला स्थापन झाली परंतु 1995 ला सत्ता आली.

सध्याचं राजकारण पाहता प्रत्येकाल असं वाटत आहे की, सगळ्या गोष्टी लवकर झाल्या पाहीजेत. सगळं पटकन झालं पाहीजे. पण त्यासाठी जीवाचं रान करावं लागतं. आपल्या जीवनात विजय झाले, पराजय झाले मात्र कधीच खचलो नाही आणि खचणारही नाही, असंही ठाकरे यावेळी म्हणाले.

पराभव होईल पण खचून जाऊ नका. विरोधक तुमच्यावर हसतील आणि म्हणतील हे काय करत आहे. फक्त पाय जमीनीत रोवून उभा रहा,विजय आपालच होईल, असं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना मोठा आधार दिला आहे.

दरम्यान, राज ठाकरे नागपूर दौऱ्यावर असल्यानं ते कोणत्या राजकीय नेत्याची भेट घेणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा होत आहेत.

महत्वाच्या बातम्या-