Shivraj Singh Chouhan | ‘तुम्हीच सर्वांचे आवडते’; शिवराज सिंह चौहानांसमोर लाडक्या बहिणी ढसाढसा रडल्या

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Shivraj Singh Chouhan Video | मोहन यादव यांना मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी दिल्याने जेपी हायकमांडने सर्वांना आश्चर्यचकित केले. ते लवकरच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान, माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान ( Shivraj Singh Chouhan) यांनी त्यांच्या महिला समर्थकांची भेट घेतली तेव्हा सर्वांचे डोळे पाणावले.

एक व्हिडीओ (Video) समोर आला आहे ज्यामध्ये शिवराज महिलांमध्ये ( Shivraj Singh Chouhan) उभे राहून लोकांना समजावताना दिसत आहेत, मात्र तिथे उपस्थित असलेले लोक शिवराज यांना मुख्यमंत्री न करण्याचा निर्णय मानायला तयार नाहीत.

“तुम्ही सर्वांचे आवडते आम्हाला तुम्हीच हवेत”

एएनआय या वृत्तसंस्थेने जारी केलेल्या व्हिडीओमध्ये एक महिला ‘तुम्ही सर्वांचे आवडते, प्रत्येक बहिणीचे आवडते’ आम्ही तुम्हाला सोडणार नाही म्हणते. तर यावर शिवराज सिंह म्हणतात, ‘मी कुठे जातोय, मीही सोडणार नाही.’

व्हिडीओमध्ये एक महिला की, ‘मामा, तुम्ही खूप मेहनत केली आणि तुम्ही जिंकलात. भाऊ आम्ही तुम्हाला मतदान केलं. आम्हाला तुम्हीचं मुख्यमंत्री म्हणून हवेत.

Shivraj Singh Chouhan काय म्हणाले?

आज जेव्हा मी येथून निरोप घेत आहे, तेव्हा मला समाधान आहे की 2023 मध्ये पुन्हा एकदा भाजपने प्रचंड बहुमताने सरकार स्थापन केलं. माझं मन आनंदाने आणि समाधानाने भरलं आहे, असं शिवराज सिंह चौहान म्हणालेत.

मला विश्वास आहे की सीएम मोहन यादव यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार राज्यात सुरू असलेले प्रकल्प पूर्ण करेल. प्रगती आणि विकासाच्या बाबतीत मध्य प्रदेश नवीन उंची गाठेल. मी त्याला पाठिंबा देत राहीन, असंही त्यांनी म्हटलं आहे.

 

 

महत्त्वाच्या बातम्या- 

Gold Price Today | मोठी गुड न्यूज! सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या दर

Weather Update | राज्यातील ‘या’ भागांमध्ये पावासाचा इशारा

Disha Salian | दिशा सालियन मृत्यूप्रकरणी मोठी बातमी समोर!

Maratha Reservation | मोठी बातमी! राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षाचा तडकाफडकी राजानीमा

Share Market | ‘या’ शेअरचा बाजारात धुमाकूळ; गुंतवणूकदार मालामाल