BMC | शिंदे सरकारची मोठी खेळी; ठाकरे कुटुंब अडचणीत येणार?

मुंबई | शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना अडचणीत आणण्यासाठी शिंदेंनी नवा प्लॅन आखल्याचं बोललं जात आहे. शिंदे सरकारने मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) गेल्या 25 वर्षांच्या कारभाराची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

BMC च्या कारभाराची चौकशी?

शिंदे सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची अडचण होणार आहे. सरकारच्या या निर्णयानंतर ठाकरे गटही आक्रमक झाला आहे.

आमच्याच कारकिर्दीतील नव्हे तर तुमच्या कारकिर्दीतील ऑडिट करा, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायकर राऊत यांनी केली.

हिंमत असेल तर मुंबई मनपाचे निवडणूक घेऊन दाखवा. मग जनताच तुमचे ऑडिट करेल. निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन ही चौकशी केली जात असल्याचा आरोप राऊतांनी केला.

BMC | उदय सामंत काय म्हणाले?

कोरोनामध्ये मुंबई महानगरपालिकेत (BMC) मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचं समोर आलं आहे. तसेच इतर अनेक गैरव्यवहाराचे आरोप होत आहे. यामुळे मुंबई महानगर पालिकेच्या कारभाराची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मुंबई मनपाच्या सर्व आर्थिक व्यवहाराची चौकशी करण्यात येणार आहे. त्यासाठी श्वेतपत्रिका काढणार आहे, असं उदय सामंत यांनी सांगितलं.

“इतक्या मिर्च्या का झोंबल्या”

मुंबई मनपाच्या चौकशीचा निर्णय होताच इतक्या मिर्च्या का झोंबल्या. कोव्हीड सेंटरमध्ये घोटाळे सर्वांसमोर आलेत, असं सामंत म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

Shivraj Singh Chouhan | ‘तुम्हीच सर्वांचे आवडते’; शिवराज सिंह चौहानांसमोर लाडक्या बहिणी ढसाढसा रडल्या

Gold Price Today | मोठी गुड न्यूज! सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या दर

Weather Update | राज्यातील ‘या’ भागांमध्ये पावासाचा इशारा

Disha Salian | दिशा सालियन मृत्यूप्रकरणी मोठी बातमी समोर!

Maratha Reservation | मोठी बातमी! राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षाचा तडकाफडकी राजानीमा