Maratha Reservation | मोठी बातमी! राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षाचा तडकाफडकी राजानीमा

मुंबई | मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आज विधानसभेत चर्चा होण्याची शक्यता असतानाच राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायामूर्ती आनंद निरगुडे यांनी अध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे.

आयोगाच्या कामात सरकारमधील दोन मंत्री हस्तक्षेप करत असल्याचे आरोप त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे राज्य सरकारने निरगुडे यांचा राजीनामा स्वीकारलाही आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये राज्य मागासवर्ग आयोगातील बबनराव तायवाडे, संजय सोनावणे, लक्ष्मण हाके, बी एल किल्लारीकर या सदस्यांनी सरकारी हस्तक्षेपाचे कारण देत राजीनामे दिले होते. त्यानंतर आता आयोगाच्या अध्यक्षांनीही राजीनामा दिल्याने राज्य मागासवर्ग आयोगच बरखास्त होण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

Share Market | ‘या’ शेअरचा बाजारात धुमाकूळ; गुंतवणूकदार मालामाल

Kalicharan Maharaj | ‘राममंदिर उद्ध्वस्त…’; कालिचरण महाराजांचं वादग्रस्त वक्तव्य

Manoj Jarange | मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांची प्रकृती बिघडली

Stop Clock Rule | आता गोलंदाजांचं काही खरं नाही, आयसीसीनं आणला नवा नियम

Agriculture News | राज्याच्या ‘या’ भागात शेतकऱ्यांसमोर नवं संकट, महत्त्वाची माहिती समोर