Kalicharan Maharaj | ‘राममंदिर उद्ध्वस्त…’; कालिचरण महाराजांचं वादग्रस्त वक्तव्य

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

पुणे | कालीपुत्र कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) पुन्हा एकदा वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. पुणे जिल्ह्यातील भोरमध्ये बोलताना त्यांनी एक वक्तव्य केलं. या वक्तव्यामुळे पुन्हा वाद होण्याची शक्यता आहे.

काय म्हणाले Kalicharan Maharaj?

राममंदिर उद्ध्वस्त व्हावं हे मुस्लिमांचे मनसुबे आहेत. तसं त्यांनी टीव्हीवर सांगितलं आहे. 20 वर्षांनंतर जेव्हा आमची संख्या जास्त होईल. तेव्हा राममंदिर आम्ही पुन्हा फोडून टाकू. जी भीती महंतांनी व्यक्त केली ती खरी आहे, असं कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) यांनी म्हटलं आहे.

पुण्याच्या भोर तालुक्यातल्या नसरापूरच्या बनेश्वर मंदिरात कालीचरण महाराजांच्या हस्ते महाभस्मारती आणि सहस्त्र जलधारा अभिषेक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

कार्यक्रमासाठी परिसरातले भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कालीचरण महाराज आणि महादेवाच्या पिंडीचं दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी कालीचरण महाराज बोलत होते.

“हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकार व्हावं”

छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकार व्हावं. सर्व हिंदूंनी भगव्या ध्वजाखाली एकत्रित व्हावं. हिंदुराष्ट्र व्हावं हीच प्रार्थना आहे, असंही कालिचरण महाराज (Kalicharan Maharaj) यांनी म्हटलं आहे. राममंदिराच्या उद्घाटनावर बोलताना अयोध्या तो झाकी है और काशी मथुरा बाकी है, असं त्यांनी म्हटलं.

आम्हाला सावरकर पाहिजे आहेत. ज्यांना सावरकर नको असतील. त्यांनी काढण्याचा प्रयत्न करा. आम्ही लावण्याचा प्रयत्न करू. लोकांच्या डोक्यात आम्ही सावरकर टाकण्याचा प्रयत्न करू, असं ते म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

Stop Clock Rule | आता गोलंदाजांचं काही खरं नाही, आयसीसीनं आणला नवा नियम

Agriculture News | राज्याच्या ‘या’ भागात शेतकऱ्यांसमोर नवं संकट, महत्त्वाची माहिती समोर

OUT or NOT OUT? क्रिकेट विश्वात घडलेल्या ‘या’ प्रकाराची संपू्र्ण जगात चर्चा

Rupali Chakankar | रुपाली चाकणकरांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी, नेमका काय आहे प्रकार?

Crime | खतरनाक प्लॅनिंग; ठाण्यातील हत्याकांडाने महाराष्ट्रात खळबळ