Stop Clock Rule | आता गोलंदाजांचं काही खरं नाही, आयसीसीनं आणला नवा नियम

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | क्रिकेटच्या जगात वेळोवेळी नियम बदलले गेले आहेत. आता आणखी एक नवा बदल होणार आहे. एकदिवसीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामने वेळेवर संपावेत यासाठी आयसीसी प्रयत्न करत आहे. त्यामुळे याआधीही अनेक नियम लागू करण्यात आले होते, मात्र आता त्यात आणखी काही गोष्टींची भर पडली आहे.

आयसीसीनं आणला ‘हा’ नवा नियम

12 डिसेंबरला वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यात होणारा पहिला टी-20 सामना या नियमानुसार खेळवला जाईल. विशेषत: संघ आणि कर्णधाराने चूक केल्यास क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या विरोधात हा नियम जाईल. ICC चा नवीन नियम ‘Stop Clock Rule’ 6 महिन्यांसाठी चाचणी आधारावर वापरला जाईल.

काय आहे Stop Clock Rule?

Iया नियमानुसार, षटक सुरू होताच अंपायरचे घड्याळ सुरू होईल, त्यानंतर दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीच्या दरम्यान किती वेळ निघून जाईल हे पाहिले जाईल.

जर गोलंदाज वेळेत त्याचे षटक सुरू करू शकला नाही तर 5 धावांचा दंड आकारला जाईल. तसेच संघ पुढील ओवर 60 सेकंदात सुरू करू शकला नाही, तर त्याचा फायदा फलंदाजी करणाऱ्या संघाला मिळेल.

हा नियम 12 डिसेंबरपासून इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात (ENG vs WI) खेळल्या जाणार्‍या पाच सामन्यांच्या T20 मालिकेत चाचणी म्हणून वापरला जाईल. या मालिकेत हा नियम यशस्वी झाला तर त्याची पूर्ण अंमलबजावणी होऊ शकते.

हा Stop Clock Ruleकेवळ गोलंदाजांसाठीच नाही तर फलंदाजांसाठीही आहे. विकेट पडल्यानंतर किंवा फलंदाज निवृत्त झाल्यानंतर, पुढील दोन मिनिटांत पुढचा फलंदाज पहिला चेंडू खेळू शकला नाही, तर फलंदाज बाद मानला जाईल. या नियमाला टाइम आउट म्हणतात.

महत्त्वाच्या बातम्या- 

Agriculture News | राज्याच्या ‘या’ भागात शेतकऱ्यांसमोर नवं संकट, महत्त्वाची माहिती समोर

OUT or NOT OUT? क्रिकेट विश्वात घडलेल्या ‘या’ प्रकाराची संपू्र्ण जगात चर्चा

Rupali Chakankar | रुपाली चाकणकरांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी, नेमका काय आहे प्रकार?

Crime | खतरनाक प्लॅनिंग; ठाण्यातील हत्याकांडाने महाराष्ट्रात खळबळ

Rohit Sharma | रोहित शर्मा फिट नाही?, बीसीसीआयचा सर्वात मोठा खुलासा