Manoj Jarange | मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांची प्रकृती बिघडली

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

बीड | मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांचा राज्यभरात मराठा संवाद दौरा सुरू आहे. या दौऱ्यादरम्यान आज धाराशिव येथे सभा सुरू असताना अचानक त्यांची तब्येत खालावल्याचं समोर आलं.

मनोज जरांगे पाटलांची प्रकृती बिघडली

मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना ॲडमिट करून घेण्यात आलं आहे.

मनोज जरांगे पाटील यांना अशक्तपणा आला आहे. प्रचंड थकवा आहे. दगदग आणि धावपळ तसेच उन्हात रॅली काढणं यामुळे त्यांची प्रकृती बिघडल्याचं सांगितलं जात आहे.

Manoj Jarange यांना आराम करण्याचा सल्ला

दौऱ्यांमुळे वेळेवर जेवण नसल्यानेही त्यांची प्रकृती बिघडल्याचं वैद्यकीय सूत्रांनी सांगितलं. जरांगे पाटील यांना कमीत कमी तीन महिने आराम करण्याचा सल्ला त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर संदीप थोरात यांनी दिला आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या राज्यभर सभा सुरू आहेत. आज त्यांनी मराठवाड्यात सभांचा धडाका लावला होता. आज त्यांची बीडमध्ये सभा पार पडली. बीड जिल्ह्यातील अंबासाखर कारखाना(वाघाळा) येथे मनोज जरांगे पाटील यांची पहिल्यांदा सभा झाली. या सभेला प्रचंड गर्दी झाली होती.

या सभेपूर्वीच्या एका सभेला संबोधित करत असताना मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली होती. डॉक्टरांनी येऊन जरांगे पाटील यांची प्रकृती तपासली. त्यांना तीन महिने आराम करण्याचा सल्लाही दिला. पण जरांगे पाटील यांनी हा सल्ला ऐकला नाही.

महत्त्वाच्या बातम्या- 

Stop Clock Rule | आता गोलंदाजांचं काही खरं नाही, आयसीसीनं आणला नवा नियम

Agriculture News | राज्याच्या ‘या’ भागात शेतकऱ्यांसमोर नवं संकट, महत्त्वाची माहिती समोर

OUT or NOT OUT? क्रिकेट विश्वात घडलेल्या ‘या’ प्रकाराची संपू्र्ण जगात चर्चा

Rupali Chakankar | रुपाली चाकणकरांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी, नेमका काय आहे प्रकार?

Crime | खतरनाक प्लॅनिंग; ठाण्यातील हत्याकांडाने महाराष्ट्रात खळबळ