Celebrity Fees | ‘हे’ टीव्ही कलाकार एका एपिसोडसाठी घेतात ‘इतके’ लाख; आकडा वाचून धक्का बसेल

Celebrity Fees | मोठे अभिनेते-अभिनेत्री एका चित्रपटासाठी कोटींची किंमत घेतात, हे तर आपल्याला माहितच आहे. मात्र छोट्या पडद्यावरील कलाकारही कमाईच्या (Celebrity Fees) बाबतीत मागे नाहीत. टीव्हीवरील कलाकारांचा चाहता वर्गही बराच मोठा आहे. यासोबत फिस घेण्याच्या बाबतीतही ते मागे नाहीत. काही लोकप्रिय मालिकांच्या कलाकारांची एका एपिसोडची फिस ऐकून तुम्हालाही धक्काच बसेल.

सोनी, स्टार प्लस या वाहिन्यांवरील काही लोकप्रिय कलाकार आहेत. जे एका एपिसोडसाठी चक्क लाखोंची किंमत घेतात. यात तारक मेहता का उलटा चश्मामधील सर्वांचेच आवडते कॅरेक्टर ‘जेठालाल’ म्हणजेच दिलीप जोशी यांचाही नंबर लागतो. तसेच ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मधील नायरा म्हणजेच शिवांगी जोशीही मालिकेद्वारे चांगलीच कमाई (Celebrity Fees) करते. अशाच काही कलाकारांची फिसबद्दल जाणून घेऊयात.

‘या’ फिमेल कलाकार लाखोंमध्ये घेतात मानधन

शिवांगी जोशी- अभिनेत्री शिवांगी जोशी (Shivangi Joshi) ही एका एपिसोडसाठी (Celebrity Fees) तब्बल दीड लाख रुपये मानधन   घेते. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, या मालिकेतून तिला जास्त प्रसिद्धी मिळाली. आता ती ‘बरसाते- मौसम प्यार के’ या मालिकेत ‘आराधना’ची भूमिका साकारत आहे.

रूपाली गांगुली – ‘अनुपमा’ या प्रसिद्ध मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री रूपाली गांगुलीही (Rupali Ganguly) कमाईच्या बाबतीत मागे नाहीत. रूपाली या एका एपिसोडसाठी तब्बल 3 लाख फिस घेतात. रूपाली गांगुली या यापूर्वी ‘कहाणी घर घर की’, ‘भाभी’, ‘कसोटी जिंदगी के’, अशा मालिकेमध्येही झळकल्या आहेत.

श्रद्धा आर्या- ‘कुंडली भाग्य’ या मालिकेतील मुख्य कलाकार श्रद्धा आर्या (Shraddha Arya) ही देखील फिसच्या बाबतीत मागे नाहीये. श्रद्धा एका एपिसोडसाठी एक लाख रुपये मानधन घेते.

‘हे’ मेल कलाकार घेतात इतके मानधन |

दिलीप जोशी- सर्वांचे लाडके कॅरेक्टर म्हणजेच ‘जेठालाल’ ची भूमिका साकारणारे अभिनेते दिलीप जोशी (Dilip Joshi) ही ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत 2008 पासून अद्याप काम करत आहेत. ते या मालिकेत मुख्य भुमिकेत आहेत. या मालिकेतील एका एपिसोडसाठी ते 3 लाख फिस (Celebrity Fees) घेतात. मालिकेव्यतिरिक्त दिलीप जोशी अनेक चित्रपटांमध्येही झळकले आहेत. हम आपके हे कौन, मैने प्यार किया, या चित्रपटांत त्यांनी साइड रोल केला आहे.

हर्षद चोपडा – ‘तेरे लीये’, ‘बेपानाह’, ‘अंबर धारा’ अशा मालिकेतून प्रसिद्धी मिळवलेला अभिनेता हर्षद चोपडा (Harshad Chopra) एका एपिसोड साठी 3 लाख रुपये फिस घेतो. नुकताच तो ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतही मुख्य भुमिकेत होता. छोट्या पडद्यावरील हे सर्व कलाकार एका एपिसोडमधूनच लाखोंची कमाई करतात. यासोबतच त्यांचा चाहता वर्गही मोठा आहे.

News Title-  TV Celebrity Fees

महत्त्वाच्या बातम्या- 

Don 3 | ‘सीरियल किसर ‘पुन्हा दाखवणार जादू; इमरान हाश्मी खलनायकाच्या भूमिकेत दिसणार

Munawar Faruqui | ‘एकाच वेळी दोन मुलींना…’, मुनव्वर फारूकीवर गंभीर आरोप

Astro Tips | श्रीमंत व्हायचंय?, ‘या’ सवयी पाळा, कधीच भासणार नाही पैशांची कमी

First Flying Car Booking l Traffic Jam ला टाटा बायबाय!; आता आली जगातील पहिली उडणारी कार, ‘या’ तारखेपासून बुकिंग सुरु

Voter ID Card l मतदानकार्ड वरील फोटो आणि पत्ता बदलायचा आहे? अशाप्रकारे घरबसल्या करा अपडेट