Mutual Fund SIP | ‘या’ दोन SIP स्कीम देतील कोटींचा परतावा; जाणून घ्या सविस्तर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Mutual Fund SIP | शिक्षण असो किंवा आरोग्य असो कोणत्या घटकासाठी कधी आर्थिक गरज समोर येईल, काही सांगता येत नाही. बऱ्याचदा आपल्याला अचानकच मोठ्या रक्कमेची गरज पडत असते. अशावेळी बँकेतून कर्ज घेण्यापेक्षा एक सोपा आणि फायदेशीर मार्ग म्हणजे एसआयपी फंड आहे. एसआयपी तुम्हाला कधीही फायदेशीर ठरू शकते.

दर महिन्याला एक ठराविक रक्कम गुंतवल्यास तुम्ही काही वर्षांत लाखो-करोडो रुपयांचा निधी उभारू शकता. म्युच्युअल फंड एसआयपी (Mutual Fund SIP) हा असाच एक पर्याय आहे. ज्याद्वारे तुम्ही नियमित गुंतवणूक करण्यापेक्षा लहान बचत ही दीर्घकालीन मोठ्या स्वरूपात रूपांतरित करू शकता. आताची लहान बचत भविष्यात मोठ्या गुंतवणूकीमध्ये तुम्हाला फायद्याची ठरू शकते.

दहा वर्षांत मिळवा कोटींचा परतावा

इक्विटी म्युच्युअल फंडातील SIP (Mutual Fund SIP) गुंतवणूकदारांनी गेल्या 10 वर्षात तब्बल 27 टक्क्यांपर्यंत वार्षिक परतावा मिळवला आहे. यामध्ये तुम्ही प्रत्येक महिन्याला जर 20,000 रुपये गुंतवले तर, 10 वर्षांमध्ये त्याचं मूल्य एक कोटींपेक्षा अधिक होऊ शकतं. म्हणजेच, 24 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर तुम्हाला दहा वर्षांत 76 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळतील.

या एसआयपीमध्ये तुम्ही एक हजार पासूनही सुरुवात करू शकता. तर किमान गुंतवणूक ही 5000 रुपये आहे. 31 डिसेंबर 2023 पर्यंत या योजनेची मालमत्ता 13,002 कोटी रुपये होती आणि खर्चाचे प्रमाण 0.77% होते. त्यामुळे या फंडमध्ये फायद्यासोबतच रिस्कही तेवढीच असणार आहे.

यासोबतच तुम्ही क्‍वांट स्‍मॉल कैप फंडमध्येही गुंतवणूक करू शकता. या एसआयपीमध्येही तुम्ही 20 हजार महिन्याला भरून दहा वर्षांत 76 लाखांपेक्षा अधिक रक्कम प्राप्त करू शकता. या स्कीममध्येही एक हजार रुपये भरून तुम्ही गुंतवणूक करू शकता.

पैसे गुंतवताना विचार करा

बीपीएन फिनकैपचे डायरेक्‍टर ए.के. निगम यांनी म्हटलं की, SIP गुंतवणूक ही एक सिस्‍टमेटिक पद्धत आहे. ही गुंतवणूक फायद्याची ठरू शकते. मात्र यात रिस्कही तेवढी मोठी आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करण्याअगोदर (Mutual Fund SIP) आपले इन्कम, टर्गेट आणि रिस्‍क प्रोफाईल बघूनच गुंतवणूकीचा निर्णय घ्यावा. त्यामुळे ही एसआयपीमध्ये तुम्ही जर गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर, तुम्हाला रिस्क घ्यावी लागेल.

रिस्क घेतली तर, दहा वर्षांत वीस हजार दर महिन्याने भरल्यास कोटींचा फायदा होऊ शकतो. तर परिस्थिती या उलटही तुम्हाला पाहायला मिळू शकते. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना एकदा विचार नक्कीच करावा.

महत्त्वाच्या बातम्या- 

Narendra Modi | ‘आई, बहीण आणि मुलींच्या नावाने…’; नरेंद्र मोदींचं तरूणांना आवाहन

Mahalakshmi | प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आयुष्यात मोठं वादळ, पती ICU मध्ये दाखल

Don 3 | ‘सीरियल किसर ‘पुन्हा दाखवणार जादू; इमरान हाश्मी खलनायकाच्या भूमिकेत दिसणार

Munawar Faruqui | ‘एकाच वेळी दोन मुलींना…’, मुनव्वर फारूकीवर गंभीर आरोप

Astro Tips | श्रीमंत व्हायचंय?, ‘या’ सवयी पाळा, कधीच भासणार नाही पैशांची कमी