“राखी कोणाचा मार खाईल असं तुम्हाला वाटतं का?”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | अभिनेत्री राखी सावंतनं(Rakhi Sawant) तिच्या पतीवर म्हणजेच आदिल खानवर(Adil khan) गंभीर आरोप करत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर अंधेरी न्यायालयानं आदिलला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

आदिलनं आपले न्यूड व्हिडीओ विकल्याचा आरोप राखीनं आदिलवर केला आहे. तसेच त्यानं मारहाण केल्याचा आणि त्यानं आपल्याकडून दीड कोटी रूपये घेतल्याचा आरोपही राखीनं आदिलवर केला आहे.

त्यातच आता आदिलच्या वकिलांनी राखीच्या आरोपांवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. आदिलचे वकिल म्हणाले आहेत की, हे सगळं पूर्वनियोजीत आहे. या आरोपांना काहीच आधार नाही.

तुम्हाला वाटतं का, राखी खरंच इतकी कमजोर आहे की तिला कोणीही मारू शकेल आणि राखीही काहीही न म्हणता हे सगळं सहन करेल, असंही आदिलचे वकिल म्हणाले आहेत.

आदिल चांगल्या घरातील आहे. त्याला व्हिडीओ शूट करण्याची गरज नाही. राखीनं पहिल्या नवऱ्याकडूनही विभक्त झाल्यानंतर पैसे घेतले होते आणि आता आदिलसोबतही ती तेच करत आहे, असंही आदिलचे वकिल म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-