उद्धव ठाकरेंना मोठा झटका; कार्यकर्तेही आक्रमक

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | बुधवारी शिंदे गटाने मुंबई महापालिकेतील(Mumbai Municipal) शिवसेनेचे(Shivsena) कार्यलय ताब्यात घेतलं आहे. त्यामुळं ठाकरे आणि शिंदे गटाचे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते.

शिवसेना कार्यलय शिंदे(Eknath Shinde) गटानं ताब्यात घेतल्यानं ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटाविरूद्ध जोरदार घोषणाबाजी केली. 40 खोके एकदम ओके, आवाज कोणाचा शिवसेनेचा, उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा यावेळी गटाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी दिल्या.

ठाकरे-शिंदे गटाचा हा गोंधळ सुरू असतानाच काही गैरप्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी दोन्ही गटांच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना महापालिकेच्या बाहेर काढलं.

मुंबई बाळासाहेबांच्या शिवसेनेची आहे. बाळासाहेबांच्या संकल्पनेचेच आम्ही काम करत आहे. अनेक वर्षे आम्ही या कार्यालयातून काम केलं आहे, त्यामुळं या कार्यलयाचं महत्व आमच्यासाठी खूप आहे, असा दावा शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी केला आहे.

दरम्यान, आम्ही इतर लोकांना भीक देत नाही. ज्यांना आरोप करायचा आहे, त्यांनी करत रहावा. पण आम्ही मुंबईचा विकास करून दाखवू, असंही शेवाळे यावेळी म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-