गौतमी पाटीलला सर्वात मोठा धक्का!

मुंबई | गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) चाहत्यांसाठी अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे. गणेशोत्सव काळात कोल्हापूर जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेले गौतमी पाटीलचे (Gautami Patil) कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. मनोरंजन विभाग आणि पोलिसांनी परवानगी नाकारल्याने गौतमीचे कार्यक्रम रद्द करण्याची वेळ आली आहे.

गणेशोत्सव काळातील पोलिसांवर असलेला अतिरिक्त ताण लक्षात घेता कार्यक्रमासाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त देता येणार नसल्याचं कारण पोलिसांनी दिलंय. त्यामुळे गौतमीचे 22 आणि 24 सप्टेंबरला कोल्हापूरच्या ग्रामीण भागात होणारे हे कार्यक्रम आता होणार नाही. या कार्यक्रमांना परवानगीच नाकारल्याची माहिती आता कोल्हापूरच्या अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली आहे.

गणेशोत्सव आहे. सणासुदीचा काळ आहे. त्यामुळे आमच्यावर अतिरिक्त ताण आहे. ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवावा लागत आहे. त्यामुळे उत्सव काळात उत्सवाखेरीज इतर कुठेही पोलीस बंदोबस्त देणं शक्य नाही, असं कारण पोलिसांनी दिलं आहे. त्यामुळे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना आता कोल्हापूरकरांना मुकावं लागणार आहे. तसेच याचा फटका गौतमीला देखील बसणार आहे.

दुसरीकडे, गौतमीच्या ‘घुंगरू’ या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. या सिनेमाच्या माध्यमातून गौतमी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवत आहे. या सिनेमात अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहे. बाबा गायकवाड यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.

दरम्यान, ‘लावणी क्वीन’ला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. ‘घुंगरू’ या सिनेमात प्रेक्षकांना राजकारणासह थरार-नाट्य पाहायला मिळणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-