आता ‘या’ कंपनीवरही अदानींचा ताबा, शेअरच्या किमतीत मोठा धमाका

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | काहीदिवसांपूर्वी प्रसिद्ध अशी NDTV ही न्युज चॅनेल कंपनीची अर्धी भागीदारी गौतम अदानींकडे (Gautam Adani) गेली होती. यामुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. खुद्द कंपनीचे प्रवर्तक असणारे प्रणय राॅय आणि नंदिता राॅय यांना ही गोष्ट माहित नसल्याचं सांगण्यात आलं होतं.

त्यासबंधी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. आशियातील श्रीमंत असणारे मोठे उद्याेगपती गौतम अदानी या मिडीया कंपनीचे मालक होण्याच्या तयारीत आहेत. सध्या NDTV मध्ये अदानी यांची 29.11 टक्के हिस्सेदारी आहे. तर प्रणय राॅय(Pranay Roy) आणि नंदिता राॅय यांच्याकडे 32 टक्क्यापेक्षा जास्त आहे.

त्यामुळेच अतिरिक्त असणारे 26 टक्के शेअर्स (shares) अदानींनी खरेदीसाठी काढले आहेत. ही ऑफर 25 नोव्हेंबरला ओपन केली आहे. अदानींची ही ऑफर 5 डिसेंबरपर्यंत आहे.

NDTV चे संस्थापक प्रणव राॅय आणि कार्यकारी संचालक नंदिता राॅय दोघांनी देखील आरआरपीआर होल्डिंग प्रायव्हेड लिमिटेड (RRPR HOLDING PRIVATE LIMITED) च्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. सुदिप्ता भटाचार्य, संजय पुगलिया आणि सेंथिल चेंगसवर्यन यांची RRPR च्या बोर्डावर संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

ही बातमी बाहेर आल्यानंतर शेअर्समधे उसळी दिसून आली आहे. यानंतर शेअर्स टक्क्यांनी 5 टक्क्यांनी वाढला आहे. या वर्षभरात अदानींचे शेअर्स 479 टक्क्यांनी वाढल्याचं दिसून आलं आहे. तसेच मीडिया स्टाॅक (stock) गेल्या चार सत्रांपासून अप्पर सर्किट लागत आहे.

ओपन ऑफर (Open offer) अंतर्गत, 1.67 कोटी शेअर्स 294 रुपये प्रति शेअर या दराने ऑफर केले जात आहेत. ओपन ऑफरचा आकार, पूर्ण सदस्यता घेतल्यास,492.81 कोटी रूपये असेल.
महत्त्वाच्या बातम्या