चिंचवड प्रचारसभेत अजित पवारांचं मोठं वक्तव्य

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | सध्या महाराष्ट्राचं लक्ष कसबा मतदारसंघात आणि चिंचवड मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीकडं लागलं आहे. त्यातच चिंचवडमध्ये ठाकरे गटाचे राहुल कलाटे(Rahul Kalate) यांनी पक्षाच्या विरोधात जाऊन अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळं महाविकास आघाडीसाठी कलाटे यांची उमेदवारी अडचणीची ठरू शकते.

महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे नाना काटे(Nana Kate) यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे. याच नाना काटे यांच्या प्रचारासाठी नुकतेच अजित पवार(Ajit Pawar), नाना पटोले(Nana Patole) आणि आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) उपस्थित राहीले होते.

यावेळी प्रचारसभेत बोलताना अजित पवार म्हणाले की, महाविकास आघाडीत चर्चा झाली आणि त्यानंतरच नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अपक्ष उमेदवारी असली तरी नाना काटेच निवडूण येतील. ती मत शिवसैनिकांची आहेत हे विसरू नका, असं म्हणत पवारांनी कलाटे यांना टोला लगावला.

माझी विनंती आहे की कोणी रूसु नका, फुगु नका, असं वक्तव्यही पवारांनी केले. पुढं बोलताना त्यांनी शिंदे गटावरही निशाणा साधला. ज्यांनी बंड केलं त्यांचा शिवसेना तयार करण्यात खारीचाही वाटा नाही, असा टोला पवारांनी शिंदे गटाला लगावला.

दरम्यान, राहुल कलाटे यांच्या बंडामुळं चिंचवडची पोटनिवडणूक महाविकास आघाडीसाठी मोठी आव्हानात्मक ठरू शकते. परंतु जनतेचा कौल कोणाच्या बाजूनं आहे, हे पाहण्यासाठी निवडणूक होऊन निकालापर्यंतची वाट पाहावी लागणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-