महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोश्यारींपेक्षा जास्त वादग्रस्त!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | वादग्रस्त वक्तव्यांमुळे अडचणीत आलेले भगतसिंह कोश्यारी (Bhagatsinh Koshyari) यांचा राजीनामा मंजूर झाला आहे. देशातील 13 राज्यांचे राज्यपाल (Governor) बदलण्यात आले आहे. त्यात भगतसिंह कोश्यारी यांचा समावेश आहे.

झारखंडचे राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) यांची आता महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली आहे. मात्र बैस यांचीही कारकिर्द कोश्यारींपेक्षा जास्त वादग्रस्त ठरली होती.

रमेश बैस (Ramesh Bais)यांचा झारखंड सरकारशी गेल्या काही दिवसांपासून संघर्ष सुरु होतो. त्यांनी झारखंड विधानसभेने संमत केलेले ‘झारखंड वित्त विधेयक-2022’ दोन दिवसांपुर्वीच राज्य सरकारकडे (State Goverment) परत पाठवलं. तिसऱ्यांदा त्यांनी हे विधेयक परत पाठवले. यामुळे झारखंड सरकार आणि राज्यपाल असा संघर्ष दिसून आला.

दरम्यान, महाराष्ट्राचे मावळते राज्यपाल कोश्यारी यांची एकंदर कारकीर्द वादग्रस्त होती. राज्यपालांनी मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार काम करावं, अशी घटनेत तरतूद असताना महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोश्यारी यांनी सरकारची अडवणूक केल्याचं बोललं गेलं.

विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नियुक्तीस नकार देणं, त्यानंतर 12 सदस्यांची नियुक्ती अडीच वर्षे प्रलंबित ठेवणं, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं या कारणांमुळे कोश्यारी वादग्रस्त ठरलेत.

महत्त्वाच्या बातम्या-